IND vs ENG WC 2023 | जिंकलो, पण पॅटर्न बदलताच टीम इंडियाची पोलखोल, दोन आघाड्यांवर दिलासा

IND vs ENG WC 2023 | टीम इंडिया सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सलग सहासामने टीम इंडियाने जिंकले आहेत. पण इंग्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा पॅटर्न बदलला. हा पॅटर्न बदलताच टीम इंडिया अडचणीत दिसली. कमतरता स्पष्ट झाल्या. नॉकआऊट मॅचआधी या कमतरता दूर करणं आवश्यक आहे. टीम इंडियाचा उपांत्यफेरीचा मार्ग मोकळा झालाय.

IND vs ENG WC 2023 | जिंकलो, पण पॅटर्न बदलताच टीम इंडियाची पोलखोल, दोन आघाड्यांवर दिलासा
Ind vs Eng world cup 2023 Rohit sharmaImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Oct 30, 2023 | 8:18 AM

लखनऊ : सतत मिळणाऱ्या यशामुळे तुम्ही आनंदी होणं स्वाभाविक आहे. पण अशा यशाचा एक पॅटर्न असतो. अमुक एका पॅटर्नद्वारे मिळणाऱ्या यशामागे अनेक कमतरता दडलेल्या असतात. वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाला हीच गोष्ट लागू होते. भारतात होत असलेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाने पहिल्या पाच सामन्यात आरामात विजय मिळवला. पण सहाव्या सामन्यात टीम इंडियाला अडचणींचा सामना करावा लागला. एक्सपर्ट्सपासून फॅन्सपर्यंत सर्वांनाच याची भीती आणि अंदाज होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्या पाच सामन्यात आधी गोलंदाजी मग फलंदाजीच्या बळावर आरामात विजय मिळवला. या पाचही विजयामागच सत्य सुद्धा तितकच महत्त्वाच आहे. टीम इंडियाने हे पाचही सामने टार्गेटचा पाठलाग करताना जिंकले होते. त्यामुळे सहाजिकच एक प्रश्न निर्माण झालेला की, प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची फलंदाजी इतकी मजबूत असेल का?. दव पडल्यानंतर भारतीय गोलंदाज प्रतिस्पर्धी टीमला गार करतील का? असे प्रश्न होते.

लखनऊमध्ये या प्रश्नाच उत्तर मिळालं. पण मनात जी भीती होती, तेच घडलं. इंग्लंड विरोधात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली. टीम इंडियाकडून रोहित शर्मा कॅप्टन इनिंग खेळला. त्याने 87 धावा केल्या. पण टीमने 50 ओव्हर्समध्ये फक्त 229 धावा केल्या. टीम इंडियाचा टॉप आणि मिडिल ऑर्डर मोकळेपणाने धावा करु शकला नाही. शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि विराट कोहली फ्लॉप ठरले. केएल राहुलने चांगली साथ दिली. पण आक्रमक बॅटिंगच्या नादात तो सुद्धा आऊट झाला.

त्याला बॅटिंगचा गिअर बदलावा लागला

टीम इंडिया आक्रमक आणि संभाळून खेळण्याच्या नादात फसल्याच या मॅचमध्ये दिसून आलं. प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारतील, अशी अपेक्षा असते. पण टीम इंडिया यात अपयशी ठरली. फक्त रोहित शर्मा चांगला खेळला. त्याने नेहमीच्या शैलीत आक्रमक सुरुवात केली. पण विकेट पडल्यानंतर त्याला आपल्या बॅटिंगचा गिअर बदलावा लागला. गिल, कोहली, अय्यर आणि राहुल आक्रमक शॉट खेळण्यात अपयशी ठरले. टीम इंडियासाठी 2 आघाड्यांवर दिलासा

त्यात टीम इंडियासाठी 2 आघाड्यांवर दिलासा देणारी बातमी आहे. पहिल म्हणजे सूर्यकुमार यादवची बॅटिंग. वनडे क्रिकेटमध्ये सूर्याबद्दल एक्सपर्ट्स आणि फॅन्सच वेगळ मत आहे. पण टीम इंडियाने त्यावर विश्वास ठेवला. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत त्याला संधी दिली. मागच्या मॅचमध्ये तो रनआऊट झाला होता. यावेळी त्याने टीमला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं. सूर्याने दमदार 49 धावा केल्या. टेल एंडर्सची फलंदाजी ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब आहे. जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवने समाधानकारक फलंदाजी केली. त्यांनी खूप रन्स केल्या नाहीत. पण शेवटच्या 22 चेंडूत 21 धावांची भागीदारी केली.

पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.