Jasprit Bumrah | 11 दिवस असो की, 11 महिने, शेवटी बुमराहच तो, तितकाच डेंजरस, पाहा VIDEO
Jasprit Bumrah | अपेक्षा होती, तशी त्याने सुरुवात केली. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 327 दिवसांनी पुनरागमन करणाऱ्या बुमराहच्या गोलंदाजीची दिशा योग्य नव्हती. लेग स्टम्पवर ओव्हरपीच चेंडू टाकला.
डबलिन : टीम इंडियाचा प्रत्येक चाहता जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची प्रतिक्षा करत होता. आयर्लंड विरुद्धच्या T20 सीरीजमुळे ही प्रतिक्षा संपली. शुक्रवारी 18 ऑगस्टला आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्याद्वारे बुमराहने पुनरागमन केलं. दीर्घकाळानंतर जसप्रीत बुमराहला मैदानावर पुन्हा खेळताना पाहणं हे चाहत्यांसाठी पुरेस होतं. पण टीम इंडियात पुनरागमन करताना जसप्रीत बुमराहने जे केलं, ते स्वप्नासारख आहे. बुमराहने असच कमबॅक करावं, अशीच टीम इंडियाच्या प्रत्येक चाहत्याची इच्छा असेल. बुमराहने आपल्या चाहत्यांची इच्छा पूर्ण केली. 11 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जसप्रीत बुमराहने अवघ्या 2 चेंडूत धमाका केला.
मॅलेहाइड येथे ही टी 20 सीरीज खेळली जात आहे. आयर्लंड विरुद्धच्या सीरीजमध्ये जसप्रीत बुमराह टीम इंडियाच नेतृत्व करतोय. त्याने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. निर्णय घेतल्यानंतर स्वत: पहिला गोलंदाजीसाठी आला. बुमराहला पहिला चेंडू टाकण्यासाठी रनअप घेताना पाहून चाहते सुखावले. पण बुमराह जणू धमाकेदार पुनरागमन करायच हे ठरवूनच आला होता.
327 दिवसानंतर पहिल्याच चेंडूवर चौकार
अपेक्षा होती, तशी त्याने सुरुवात केली. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 327 दिवसांनी पुनरागमन करणाऱ्या बुमराहच्या गोलंदाजीची दिशा योग्य नव्हती. लेग स्टम्पवर ओव्हरपीच चेंडू टाकला. एंडी बलबर्नीने फिल्क करुन चौकार वसूल केला. पहिल्या चेंडूवरील चौकाराचा बदला बुमराहने पुढच्या चेंडूवर घेतला. ऑफ स्टम्पच्या बाहेरील गुड लेंथ चेंडूवर ड्राइव्ह करण्याच्या प्रयत्नात चेंडू बलबर्नीच्या बॅटच्या कडेला लागून थेट स्टम्पवर आला. या विकेटसह बुमराहने पुनरागमनाची घोषणा केली.
What a start from the #TeamIndia captain 🤩
Bumrah back to what he does best 💥#IREvIND #JioCinema #Sports18 pic.twitter.com/IryoviTKGo
— JioCinema (@JioCinema) August 18, 2023
आपल्याविषयी अपेक्षा निर्माण केल्या
327 दिवसानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या बुमराहने अशा पद्धतीने पुनरागमन करुन आपल्याविषयी अपेक्षा निर्माण केल्या आहेत. बुमराह इथेच थांबला नाही, त्याने तीन चेंडूनंतर आणखी एक विकेट घेतली. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर त्याने लॉरकन टकरला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यावेळी आयरिश फलंदाज चुकीच्या पद्धतीने शॉट खेळला. चेंडू स्कूप करण्याच्या नादात त्याने विकेटकीपरला कॅच दिली. पहिल्याच ओव्हरमध्ये बुमराहने 4 धावा देऊन 2 विकेट काढल्या व दमदार पुनरागमन केलं.