IND vs IRE: आयर्लंड दौरा संजू सॅमसनसाठी शेवटची संधी? त्याच्याजागी संघात एक पर्याय तयार

उद्या आयर्लंड विरुद्ध (IND vs IRE) सीरीजमधील पहिला टी 20 सामना होत आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) उद्या प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसतील.

IND vs IRE: आयर्लंड दौरा संजू सॅमसनसाठी शेवटची संधी? त्याच्याजागी संघात एक पर्याय तयार
राजस्थान रॉयल्स कॅप्टन संजू सॅमसन Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 10:35 AM

मुंबई: उद्या आयर्लंड विरुद्ध (IND vs IRE) सीरीजमधील पहिला टी 20 सामना होत आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) उद्या प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसतील. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या जागेवर त्यांचा समावेश करण्यात येईल. मुख्य कोच राहुल द्रविड यावेळी इंग्लंडमध्ये आहेत. ते इंग्लंड विरुद्धच्या मालिकेची तयारी करत आहेत. त्यांच्याजागी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्ही एस लक्ष्मण युवा टीम इंडियाचे मार्गदर्शक म्हणून संघासोबत असतील. राहुल द्रविड यांनी आखलेल्या योजनेचे, ते अनुकरण करतील अशी अपेक्षा आहे. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत कसोटी संघात आहेत. त्यामुळे त्यांच्याजागी सूर्यकुमार आणि सॅमसनचा सहभाग निश्चित आहे. सूर्यकुमार दुखापतीनंतर संघात पुनरागमन करतोय. संजू सॅमसनकडे आपली निवड सार्थ ठरवण्यासाठी ही शेवटची संधी असू शकते. सूर्यकुमार यादव मागच्या वर्षभरापासून भारताच्या टी 20 संघाचा नियमित खेळाडू आहे.

ऋतुराजला संधी मिळेल?

दीपक हुड्डा हा संजू सॅमसनला पर्यायही ठरु शकतो. ऑफ स्पिन गोलंदाजी करण्याबरोबरच मोठे फटके खेळण्याची हुड्डाची सुद्धा क्षमता आहे. राहुल द्रविडच्या कोचिंगची पद्धत बघितली, तर ते जास्त पर्याय शोधण्याच्या फंदात पडत नाहीत. ऋतुराज गायकवाडला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सीरीजमध्ये प्रभाव पाडता आला नाही. त्याला आयर्लंड विरुद्ध संधी मिळू शकते.

हे सुद्धा वाचा

दिनेश कार्तिक हार्दिकच्या आधी फलंदाजीला येणार?

इशान किशनने रिजर्व सलामीवीर म्हणून पुढच्या काही महिन्यांसाठी आपलं स्थान पक्क केलं आहे. पुढचे काही महिने त्याची हीच भूमिका राहू शकते. इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टी 20 मालिकेत तोच रोहितसोबत सलामीला उतरु शकतो. हार्दिक पंड्याने मागच्या सीरीजमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. त्याचा हाच क्रमांक कायम राहू शकतो. दिनेश कार्तिककडे विशिष्ट जबाबदारी आहे. परिस्थितीनुसार, तो हार्दिक पंड्याच्या आधी सुद्धा फलंदाजीला येऊ शकतो. जम्मू एक्स्पेस उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह यांना संधी मिळणार की, नाही, या बद्दल स्पष्टत नाहीय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.