IND vs IRE: आयर्लंडला कमी समजण्याची चूक नको, ‘हे’ 5 खेळाडू टीम इंडियावर पडू शकतात भारी

IND vs IRE: कॅप्टन हार्दिक पंड्या, उमरान मलिक (Umran Malik) आणि कोच व्हीव्ही एस लक्ष्मण अजून आयर्लंडमध्ये दाखल झालेले नाहीत. दोन सामन्यांच्या या सीरीजसाठी टीम इंडियाने युवा खेळडूंना संधी दिली आहे.

IND vs IRE: आयर्लंडला कमी समजण्याची चूक नको, 'हे' 5 खेळाडू टीम इंडियावर पडू शकतात भारी
ind vs ireImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 2:38 PM

मुंबई: भारताचा एक संघ इंग्लंडमध्ये सराव सामना खेळतोय. त्याचवेळी दुसरा संघ आयर्लंड विरुद्ध दोन टी 20 सामन्यांची मालिका (IND vs IRE) खेळणार आहे. या संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे (Hardik pandya) सोपवण्यात आलेय. 26 जूनला टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध सीरीजमधला पहिला टी 20 सामना खेळणार आहे. डब्लिनमध्ये हा सामना होणार आहे. कॅप्टन हार्दिक पंड्या, उमरान मलिक (Umran Malik) आणि कोच व्हीव्ही एस लक्ष्मण अजून आयर्लंडमध्ये दाखल झालेले नाहीत. दोन सामन्यांच्या या सीरीजसाठी टीम इंडियाने युवा खेळडूंना संधी दिली आहे. आयर्लंडची टीम भारतासमोर कमकुवत दिसतेय. पण घरच्या मैदानावर ते कुठल्याही टीमला दणका देऊ शकतात. भारताने आपला दुय्यम संध पाठवला असला, तरी आयर्लंडने मात्र मजबूत संघ उतरवला आहे. त्यांना मायदेशातील परिस्थितीत खेळण्याचा चांगला अनुभव आहे. आयर्लंडचे क्रिकेटपटू काउंटी क्रिकेटही खेळतात. त्यामुळे टीम इंडियाला ते धक्का देऊ शकतात. आयर्लंडचे कुठले खेळाडू टीम इंडियासाठी धोकादायक ठरु शकतात, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

  1. आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग टीम इंडियासाठी धोकादायक आहे. त्याला आयर्लंडचा सेहवाग समजतात. स्टर्लिंग आयरिश संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. तो जगभरातील टी 20 आणि टी 10 स्पर्धांमध्ये खेळत असतो. त्याच्या टॅलेंटची सर्वानाच कल्पना आहे. स्टर्लिंगने आतापर्यंत 102 टी 20 सामने खेळले आहेत. त्याने 29.53 च्या सरासरीने 2776 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 20 अर्धशतकं आहेत. स्टर्लिंगचा फॉर्म सध्या चांगला नाहीय, ही भारतासाठी चांगली बाब आहे.
  2. आयर्लंडचा कॅप्टन एंड्रयू बलबर्नी सुद्धा टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर आव्हान निर्माण करेल. त्याने 66 टी 20 सामन्यात 1429 धावा केल्या आहेत. त्याने 5 अर्धशतक झळकावली आहेत. बलबर्नी मधल्याफळीत खेळतो. तो कठीण परिस्थितीत धावा करण्यासाठी ओळखला जातो. ऑफ साइडवर तो चांगली फलंदाजी करतो.
  3. आयर्लंडचा युवा फलंदाज हॅरी टॅक्टरही महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने 32 टी 20 सामन्यात 23 पेक्षा जास्त सरासरीने 540 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 130 चा आहे.
  4. आयर्लंडकडे एक फिरकी गोलंदाजही आहे. जो टी 20 मध्ये फलंदाजांना मोकळेपणाने फलंदाजी करु देत नाही. जॉर्ज डॉकरेल याने 92 टी 20 सामन्यात 76 विकेट घेतल्यात. 7.13 त्याचा इकॉनमी रेट आहे. या गोलंदाजाविरुद्ध मोठे फटके खेळणं शक्य नाहीय.
  5. मार्क एडेयर हा वेगवान गोलंदाजही टीम इंडियाच्या अडचणी वाढवू शकतो. त्याने 39 सामन्यात 59 विकेट घेतल्यात. 7.07 त्याचा इकॉनमी रेट आहे. एडेयर आयर्लंडचा सर्वात मोठा विकेट टेकर आहे.
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.