IND vs NZ 1st T20 : पुन्हा No Ball अर्शदीप सिंहच्या 4 चेंडूंनी टीम इंडियाचा घात
IND vs NZ 1st T20 : दोन महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियन विकेट्सवर अर्शदीप सिंहने आपली क्षमता दाखवून दिली. भारताच्या वेगवान गोलंदाजीच भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. पण अर्शदीप सिंहसाठी नव्या वर्षाची सुरुवात खूपच खराब झाली.
IND vs NZ 1st T20 : न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाने क्लीन स्वीप केलं. T20 सीरीजमध्ये टीम इंडियाकडून तशीच सुरुवात अपेक्षित होती. पण असं होऊ शकलं नाही. पहिल्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियावर 21 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हार्दित पंड्याने टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतली. न्यूझीलंडने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 176 धावा केल्या. टीम इंडियाला विजयासाठी 177 धावांच टार्गेट दिलं. न्यूझीलंडच्या बॉलर्सनी टीम इंडियाला 9 बाद 155 धावांवर रोखलं. टीम इंडियाच्या पराभवाला अनेक कारणं आहेत. अर्शदीप सिंहची लास्ट ओव्हर हे त्यापैकी एक प्रमुख कारण आहे.
वेगवान गोलंदाजीच भविष्य
दोन महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियन विकेट्सवर अर्शदीप सिंहने आपली क्षमता दाखवून दिली. भारताच्या वेगवान गोलंदाजीच भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. पण अर्शदीप सिंहसाठी नव्या वर्षाची सुरुवात खूपच खराब झाली. श्रीलंकेविरुद्ध टी 20 सामन्यात त्याने नो बॉलची रांगच लावली. अर्शदीपने आता न्यूझीलंड विरुद्ध सुद्धा निराश केलय.
लास्ट ओव्हरमध्ये सर्वात वाईट स्थिती
रांचीमध्ये पहिल्या टी 20 सामन्यात डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह महागडा ठरला. त्याने 4 ओव्हर्समध्ये 51 रन्स देऊन फक्त 1 विकेट घेतला. आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये अर्शदीप सिंहने दोन वाइड चेंडू टाकले. त्यानंतर दोन चौकार खाल्ले. अर्शदीपची सर्वात वाईट स्थिती लास्ट ओव्हरमध्ये झाली. डॅरिल मिचेलने त्याच्या ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा लुटल्या, पहिल्या तीन चेंडूंवर तीन सिक्स त्यानंतर एक फोर मारला. त्यामुळे न्यूझीलंडची धावसंख्या 176 पर्यंत पोहोचली.
सिक्सची हॅट्ट्रिक
20 ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर डॅरिल मिचेलने सिक्स मारला. त्यात हा चेंडू नो बॉल ठरला. त्यानंतर पुढच्या दोन चेंडूंवर मिचेलने दोन सिक्स मारले. सिक्सची हॅट्ट्रिक केल्यानंतर चौकार मारला. अर्शदीपच्या जोडीला उमरान
फक्त अर्शदीप सिंहच नाही, युवा गोलंदाज उमरान मलिकही महागडा ठरला. 8 वी ओव्हर टाकणाऱ्या उमरानने सलग दोन चौकार, एक सिक्ससह 16 रन्स दिल्या. उमरानला त्यानंतर दुसरी ओव्हर मिळाली नाही.