IND vs NZ: टीम इंडियात 4 फास्ट बॉलर, जागा फक्त 3, हार्दिक कोणाला संधी देणार?
IND vs NZ: टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरीज जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. टीम इंडियाने रोहित शर्मा, विराट कोहली सारख्या दिग्ग्ज प्लेयर्सना विश्रांती दिलीय. त्यांच्या अनुपस्थितीत युवा प्लेयर्सकडे चांगला खेळ दाखवण्याची संधी आहे.
India vs New Zealand 1st T20: टीम इंडिया हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरीज जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. टीम इंडियाने रोहित शर्मा, विराट कोहली सारख्या दिग्ग्ज प्लेयर्सना विश्रांती दिलीय. त्यांच्या अनुपस्थितीत युवा प्लेयर्सकडे चांगला खेळ दाखवण्याची संधी आहे. टी 20 सीरीजसाठी टीम इंडियात चार वेगवान गोलंदाज आहेत. आता हार्दिक पंड्या या चौघांपैकी कोणाला संधी देणार? त्यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागेल. न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरीजसाठी भारतीय टीममध्ये अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार हे चार फास्ट बॉलर्स आहेत. या खेळाडूंनी मागच्या काही काळात चांगलं प्रदर्शन केलय. भारतीय प्लेइंग 11 फक्त 3 वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते. या चार पैकी कुठल्या एका बॉलरला बाहेर बसवलं जाईल.
‘या’ प्लेयर्सनी दाखवला दम
श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजमध्ये शिवम मावीने डेब्यु केला होता. त्याने दमदार प्रदर्शनाने सर्वांच मन जिंकलं. विकेट टेकिंग गोलंदाजी हे मावीच्या गोलंदाजीच वैशिष्टय आहे. तो किफायती गोलंदाजी करतो. कुठल्याही फलंदाजीच्या फळीची वाट लावण्याची त्याची क्षमता आहे. मावीने 3 T 20 सामन्यात 4 विकेट घेतल्यात.
स्पीडच त्याची ताकत
उमरान मलिक T20 क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरलाय. स्पीड त्याची ताकत आहे. टीम इंडियासाठी 6 टी 20 सामन्यात त्याने 9 विकेट घेतल्यात. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत अर्शदीप सिंहने शानदार प्रदर्शन केलय. अर्शदीपकडे काही चेंडूत सामना फिरवण्याची क्षमता आहे. कॅप्टन हार्दिक पंड्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अर्शदीप सिंह, उमरान मलिक आणि शिवम मावीला संधी देऊ शकतो. मुकेश कुमारला बेंचवर बसावं लागू शकतं. पृथ्वीला संधी नाही
न्यूझीलंड विरुद्ध T20 सीरीमध्ये हार्दिक पंड्याकडे टीम इंडियाच नेतृत्व आहे. रांचीमध्ये होणाऱ्या पहिल्या T20 सामन्याआधी हार्दिक पंड्याने काल पत्रकार परिषदेत, पृथ्वी शॉ ला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार नाही, हे स्पष्ट केलं. सध्या फॉर्ममध्ये असलेला शुभमन गिल आणि इशान किशची जोडी न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात सलामीला येईल, असं हार्दिकने गुरुवारी सांगितलं. शुभमन गिलने नुकत्याच संपलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये दोन शतकं झळकवली आहेत.