IND vs NZ 1st T20 : ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे Prithvi Shaw चा मार्ग सोपा झालाय?

IND vs NZ 1st T20 : हार्दिक पंड्याकडे आता काही नवीन प्रयोग करण्याची संधी आहे. पृथ्वी शॉ चा या सीरीजसाठी टीम इंडियामध्ये समावेश केलाय. त्याला संधी मिळणार का? याकडे क्रिकेटच्या जाणकारांच लक्ष असेल.

IND vs NZ 1st T20 : ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे Prithvi Shaw चा मार्ग सोपा झालाय?
Prithvi shaw triple centuryImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 3:21 PM

मुंबई – टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजमध्ये 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. उद्यापासून T20 सीरीज सुरु होईल. आता हार्दिक पंड्या T20 मध्ये पूर्णवेळ कॅप्टन आहे. श्रीलंकेनंतर न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरीज जिंकण्याच्या इराद्याने तो मैदानात उतरेल. श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 सीरीजमध्ये टीम इंडियाने 2-1 असा विजय मिळवला. आता न्यूजीलंड विरुद्ध वनडे सीरीजमध्ये सरस कामगिरी करुन दाखवण्याच आव्हान आहे. हार्दिक पंड्याकडे आता काही नवीन प्रयोग करण्याची संधी आहे. पृथ्वी शॉ चा या सीरीजसाठी टीम इंडियामध्ये समावेश केलाय. त्याला संधी मिळणार का? याकडे क्रिकेटच्या जाणकारांच लक्ष असेल. रणजी ट्रॉफीमध्ये ट्रिपल सेंच्युरी झळकवल्यामुळे पृथ्वी शॉ साठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले. जवळपास दीड वर्षानंतर पृथ्वी शॉ टीममध्ये परतलाय.

पृथ्वी शॉ ओपनिंगला येणार ?

T20 मध्ये पृथ्वी शॉ आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स टीमसाठी ओपनिंग करतो. न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी 20 साठी त्याला संधी मिळणं थोड कठीण दिसतय. कारण सलामीच्या जागेसाठी शुभमन गिल दावेदार आहे. सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंड विरुद्ध तीन वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये गिलने दोन शतकं झळकवली. त्यामुळे पृथ्वी शॉ ची सलामीच्या जागेसाठी शुभमन गिलबरोबर स्पर्धा आहे.

आता त्याच्याकडे दुर्लक्ष करण शक्य नाही

शुभमन गिल आणि कुलदीप यादव या दोन फिरकी गोलंदाजांपैकी  एकालाच रांचीमध्ये शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात संधी मिळू शकते. तीन महिन्यांपूर्वी शुभमन गिल टी 20 साठी स्पर्धेत नव्हता. पण अचानक तो फॉर्ममध्ये परतलाय. आता त्याच्याकडे दुर्लक्ष करण शक्य नाहीय. टी 20 मध्ये शुभमन गिल आपली छाप उमटवू शकलेला नाही. पण सध्याचा फॉर्म लक्षात घेता त्याला संधी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. ऋतुराज गायकवाडला दुखापत

गिलपेक्षा पृथ्वी शॉ कडे पावरप्लेमध्ये हिटिंग करण्याची चांगली क्षमता आहे. रणजीमध्ये पृथ्वीने वनडे स्टाइल बॅटिंग केलीय. पण सध्याचा फॉर्म पाहता इशान किशनसोबत गिल सलामीला येऊ शकतो. ऋतुराज गायकवाडला दुखापत झालीय. त्याच्या खेळण्याबद्दल साशंकता आहे. कदाचित तो न्यूझीलंड विरुद्धच्या संपूर्ण सीरीजला मुकू शकतो.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.