IND vs NZ 1st T20: पहिल्या मॅचआधी हेड कोच लक्ष्मण यांचा खेळाडूंना महत्त्वाचा संदेश, म्हणाले….
IND vs NZ 1st T20: वर्ल्ड कपमधली चूक सुधारली, हार्दिक पंड्यावर खूपच इम्प्रेस, म्हणाले....
वेलिंग्टन: न्यूझीलंड विरुद्ध उद्यापासून टी 20 सीरीजला सुरुवात होणार आहे. या मॅचआधी हेड कोच व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांनी कॅप्टन हार्दिक पंड्याच भरपूर कौतुक केलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. लक्ष्मण यांच्यामते हार्दिक पंड्या आपल्या कामातून टीमसमोर उदहारण ठेवतो. पंड्याच्या कॅप्टनशिपवर लक्ष्मण खूपच इम्प्रेस झाले आहेत. हार्दिक पंड्या खूपच शांत असल्याचे ते म्हणाले.
हार्दिक पंड्याबद्दल लक्ष्मण काय म्हणाले?
लक्ष्मण यांनी टीमला बिनधास्त क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. “हार्दिक पंड्या खूप चांगला नेता आहे. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सच कशा पद्धतीने त्याने नेतृत्व केलं, ते आपण पाहिलय. आयर्लंड सीरीजपासून मी त्याच्यासोबत बराच वेळ घालवलाय. तो फक्त रणनितीच्या दृष्टीनेच जागरुक नसतो. फिल्डवरही शांत असतो. उच्चस्तरीय क्रिकेट खेळताना हे सर्वात जास्त महत्त्वाच असतं. त्याच्याशी तुम्ही सहज बोलू शकता. प्लेयर्सना तो आपला कॅप्टन वाटतो” असं लक्ष्मण म्हणाले.
मॅनेजमेंटकडून टीमला काय संदेश?
“T20 मध्ये आम्हाला मुक्तपणे, बिनधास्त क्रिकेट खेळण्याची आवश्यकता आहे. आमच्याकडे असे प्लेयर आहेत, जे अशा पद्धतीच क्रिकेट खेळू शकतात. कॅप्टन आणि मॅनेजमेंटने त्यांना बिनधास्त क्रिकेट खेळण्याचा संदेश दिलाय. फक्त त्यांनी कंडिशन्स आणि परिस्थिती ध्यानात घेतली पाहिजे. त्यादृष्टीने रणनिती बनवली पाहिजे” असं लक्ष्मण पत्रकार परिषदेत म्हणाले.
He’s a fabulous leader. We’ve seen what he has done at Gujarat (Gujarat Titans) in IPL. Someone taking on leadership role in the 1st yr & and winning the cup isn’t a mean achievement. He’s not only tactically good, but he’s also very calm on the field: VVS Laxman on Hardik Pandya pic.twitter.com/Yc3RUFuu6g
— ANI (@ANI) November 17, 2022
वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये काय चुकलं?
टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. त्याचं कारण होतं, बिनधास्त क्रिकेट न खेळणं. पहिल्या 10 ओव्हर्समध्ये धावाच निघाल्या नाहीत. आता हीच बाब ध्यानात घेऊन लक्ष्मण यांनी प्लेयर्सना मोकळेपणाने खेळण्याचा सल्ला दिलाय.