IND vs NZ 1ST T20: ओपनिंगला कोण येणार? उमरानला संधी मिळेल? अशी असेल Playing 11
IND vs NZ 1ST T20: न्यूझीलंड विरुद्ध पहिला T20 सामना, भविष्याची अनेक उत्तर या सीरीजमध्ये मिळू शकतात.
वेलिंग्टन: टीम इंडियाकडून टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची संधी निसटली. ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप स्पर्धा झाली. टीम इंडिया सेमीफायनलचा अडथळा पार करु शकली नाही. या पराभवानंतर आठवड्याभराने पुन्हा एकदा टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. त्यांच्यासमोर टी 20 सीरीजमध्ये न्यूझीलंडच आव्हान आहे. वेलिंग्टनमध्ये शुक्रवारी 18 नोव्हेंबरला पहिला सामना खेळला जाईल. टीम इंडियाची प्लेइंग 11 कशी असेल? त्यावर सगळ्यांची नजर असेल.
या मालिकेच महत्त्व काय?
वर्ल्ड कप सुरु असताना, न्यूझीलंड सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली होती. कॅप्टन रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुल आणि विराट कोहली या सिनियर खेळाडूंना न्यूझीलंड सीरीजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पंड्याकडे टीमच नेतृत्व आहे. भविष्याच्या तयारीच्या दृष्टीने या सीरीजकडे पाहिलं जातय. या मालिकेत टीम इंडियाचा विचार, खेळाडूंचा वापर आणि मैदानात अमलबजावणी यावर लक्ष असेल.
ऋषभ पंतवर विशेष नजर
वेलिंग्टनमध्ये या टीमची पहिली परीक्षा आहे. काही खेळाडूंसाठी मोठी संधी आहे. यात ऋषभ पंत एक मोठ नाव आहे. वर्ल्ड कपमध्ये पंतला दोन सामन्यात संधी मिळाली. पण तो प्रभाव पाडू शकला नाही. नव्या टीममध्ये ऋषभ पंतला सलामीला पाठवलं जाऊ शकतं. इनिंगच्या सुरुवातीपासूनच त्याच्याकडून गोलंदाजांवर हल्लाबोल करण्याची अपेक्षा असेल. ऋषभ पंत 50 पेक्षा जास्त टी 20 सामने खेळलाय. पण तरी सुद्धा त्याला वनडे आणि टेस्ट सारखं यश इथे मिळवता आलेलं नाही.
ऋषभसोबत ओपनिंग पार्टनर कोण?
पंत ओपनिंगला येणार असेल, तर त्याचा जोडीदार कोण असणार? इशान किशनही या टीममध्ये आहे. मागच्या दीड वर्षापासून टीम इंडियासाठी टी 20 मध्ये तो बरेच सामने खेळलाय. पण तो सुद्धा प्रभावी कामगिरी करु शकलेला नाही. दोन्ही लेफ्टी फलंदाजांना सलामीला पाठवणं योग्य राहणार नाही. शुभमन गिलला सलामीची जबाबदारी मिळू शकते. त्याला टी 20 मध्ये पहिल्यांदा संधी मिळालीय. गिलने IPL 2022 मध्ये चांगली कामगिरी केली होती. आक्रमक फलंदाजीबरोबर डाव संभाळण्याची दुहेरी जबाबदारी तो निभावू शकतो.
मीडिल ऑर्डरमध्ये कोणाला संधी?
मीडिल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार यादव आणि कॅप्टन हार्दिक पंड्याला साथ देण्यासाठी श्रेयस अय्यर आणि दीपक हुड्डापैकी एकाला संधी मिळू शकते. गोलंदाजी करु शकणाऱ्या फलंदाजांना संधी दिली पाहिजे, असं हेड कोच व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांनी म्हटलय. अशामध्ये दीपक हुड्डा फिट बसतो. श्रेयस अय्यरही गोलंदाजी करतो. पण हुड्डाची बाजू थोडी वरचढ आहे. फिनिशरच्या रोलमध्ये दिनेश कार्तिक सारखीच भूमिका संजू सॅमसन निभावू शकतो.
कुठल्या बॉलर्सना संधी मिळणार?
वेलिंग्टनमधील परिस्थिती लक्षात घेता, तीन वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते. टीम बदलाचा विचार करतेय, तर उमरान मलिकला संधी दिली पाहिजे. भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंह स्विंग गोलंदाजी करु शकतात. भुवीवर चांगल्या कामगिरीचा दबाव असेल. भुवीला संधी दिली नाही, तर त्याच्याजागी हर्षल पटेल, मोहम्मद सिराजला चान्स मिळू शकतो. यात सिराजची बाजू थोडी वरचढ आहे. स्पिन गोलंदाजीत युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळेल.
टीम इंडियाची संभाव्य Playing 11
हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, श्रेयस अय्यर/दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, उमरान मलिक आणि युजवेंद्र चहल