INDvsNZ, 3rd ODI : कुलदीप-शार्दूलची कमाल, टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 90 धावांनी शानदार विजय

टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 386 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 295 धावांवरच ऑलआऊट केलं.

INDvsNZ, 3rd ODI : कुलदीप-शार्दूलची कमाल, टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 90 धावांनी शानदार विजय
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 9:34 PM

इंदूर : टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर 90 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. न्यूझीलंडला विजयासाठी 386 धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला 41.2 ओव्हरमध्ये 295 धावांवरत ऑलआऊट केलं. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 138 धावांची खेळी केली. तर हेनरी निकोलसने 42 रन्स केल्या. या दोघांव्यतिरिक्त भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना मैदानात फार टिकू दिलं नाही.

टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. युझवेंद्र चहलने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हार्दिक पांड्या आणि उमरान मलिक या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

हे सुद्धा वाचा

दरम्यान त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 385 धावा केल्या. टीम इंडियाकडून शुबमन गिल आणि कॅप्टन रोहित शर्मा या सलामी जोडीने शतकी खेळी केली.

न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा धुव्वा

शुबमनने सर्वाधिक 112 धावा केल्या. तर रोहितने 3 वर्षानंतर शतक ठोकलं. रोहितने 101 रन्सचं योगदान दिलं. या दोघांव्यतिरिक्त हार्दिक पांड्याने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली.

न्यूझीलंडकडून जेकब डफी आणि ब्लेयर टिकनर या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. मिचेल ब्रेसवेलने 1 विकेट घेत या दोघांना उत्तम साथ दिली.

न्यूझीलंडला क्लीन स्वीप

दरम्यान या विजयासह टीम इंडियाने न्यूझीलंडला 3-0 च्या फरकाने क्लीन स्वीप केलं आहे. तसेच टीम इंडियाने आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि उमरान मलिक.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : फिन एलन, डेवन कॉनवे, हेनरी निकल्स, डॅरेल मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, जॅकब डफी, ब्लेयर टकनर आणि लॉकी फर्ग्यूसन.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.