IND vs NZ: Rishabh Pant ला लास्ट चान्स, त्यानंतर ‘या’ खेळाडूला मिळणार संधी

IND vs NZ: न्यूझीलंड विरुद्ध तिसरा टी 20 सामना ऋषभसाठी 'करो या मरो'

IND vs NZ: Rishabh Pant ला लास्ट चान्स, त्यानंतर 'या' खेळाडूला मिळणार संधी
Rishabh-PantImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 2:48 PM

वेलिंग्टन: टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतला T20 क्रिकेटमध्ये उतरणीला लागलेलं करिअर सावरण्यासाठी शेवटची संधी मिळू शकते. टेस्ट आणि वनडेमध्ये ऋषभ पंतच्या टीममधील स्थानाला कोणी हात लावू शकत नाही. पण तेच T20 क्रिकेटमध्ये ऋषभ पंतचा अजूनही संघर्ष सुरु आहे. टी 20 वर्ल्ड कप टुर्नामेंटमध्ये टीम मॅनेजमेंटने त्याच्याऐवजी दिनेश कार्तिकवर विश्वास दाखवला. ऋषभला दोन मॅचमध्ये संधी मिळाली, पण तो प्रभावी कामगिरी करु शकला नाही.

न्यूझीलंडमध्येही अपयश

आता न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या टी 20 मालिकेत ऋषभ पंतचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. काल दुसऱ्या टी 20 सामन्यात त्याला ओपनिंगला पाठवल होतं. पण ऋषभ अपयशी ठरला. त्याने 13 चेंडूत फक्त 6 धावा केल्या.

पंतची जागा कोण घेणार?

ऋषभ पंतच्या बाबतीत टीम मॅनेजमेंटचा संयम संपत चाललाय. त्याला परफॉर्मन्स द्यावा लागेल, अन्यथा त्याची जागा घेण्यासाठी दुसरा खेळाडू तयार आहे. ऋषभ पंतच्या जागी संजू सॅमसनचा पर्याय उपलब्ध आहे. मंगळवारी न्यूझीलंड विरुद्ध दुसरा टी 20 सामना होणार आहे. या मॅचमध्ये ऋषभला संधी मिळेल. पंतवर चांगली कामगिरी करुन दाखवण्याचा निश्चित दबाव असेल. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.

2022 साली पंतने टी 20 मध्ये किती धावा केल्या?

2022 साली टी 20 च्या 22 सामन्यात ऋषभला संधी मिळाली. त्याने 135.6 च्या स्ट्राइक रेटने फक्त 346 धावा केल्या आहेत. त्या तुलनेत संजू सॅमसनला मर्यादीत संधी मिळाली. त्याने 2022 मध्ये 6 टी 20 सामन्यात 179 धावा केल्या आहेत. सॅमसनचा स्ट्राइक रेट प्रभावी आहे. त्याने 140 पेक्षा जास्तच्या स्ट्राइक रेटने या धावा केल्या आहेत. पंत पाचव्या स्थानावर अपयशी ठरला. म्हणून त्याला ओपनिंगला संधी दिली. पण तिथेही तो चमक दाखवू शकलेला नाही.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.