रोहित-इशानची धडाकेबाज सुरुवात, दीपक चाहरकडून स्ट्राँग फिनिश, भारताचं न्यूझीलंडला 185 धावांचं आव्हान
सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशनने आक्रमक पवित्रा घेतला होता. दोघांनी जोरदार फटकेबाजी करत पॉवर प्लेमध्ये 69 धावा कुटल्या. 6 व्या षटकात या जोडीने 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 20 धावा फटकावल्या.
कोलकाता : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज कोलकाता येथील ऐतिहासिक स्टेडियम ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला घेतला होता. हा निर्णय त्याने आणि इशान किशनने योग्य ठरवला. सलामीच्या जोडीने अवघ्या 6.2 षटकात 69 धावांची सलामी दिली. मधल्या षटकांमध्ये भारताची फलंदाजी ढेपाळली, मात्र हर्षल पटेल आणि दीपक चाहरने अखेरच्या षटकात चांगली फटकेबाजी करुन भारताला 184 धावांपर्यत मजल मारुन दिली. दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने उत्कृष्ट गोलंदाजी केली, त्याने 3 षटकात 27 धावा देत 3 बळी घेतले. तसेच अॅडम मिल्ने, इश सोढी आणि लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी एक विकेट घेतली. (IND vs NZ 3rd T20 : Rohit Sharma’s half century, India challenge New Zealand 185 runs)
सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशनने आक्रमक पवित्रा घेतला होता. दोघांनी जोरदार फटकेबाजी करत पॉवर प्लेमध्ये 69 धावा कुटल्या. 6 व्या षटकात या जोडीने 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 20 धावा फटकावल्या. सातव्या षटकात किशन 29 धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ सूर्यकुमार यादव (0) आणि ऋषभ पंत (4) झटपट बाद झाले. दरम्यान, रोहितने जोरदार फटकेबाजी करत 27 चेंडूत अर्धशतक फटकावलं. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 3 षटकार लगावले. मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर चौकार लगावत त्याने अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर रोहित 56 धावा करुन रोहित माघारी परतला. इश सोढीने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल घेत रोहितला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यरने भारताचा डाव सावरला, मात्र दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. श्रेयस 25 आणि वेंकटेश 20 धावा करुन माघारी परतले. अखेरच्या षटकांमध्ये हर्षल पटेल (18) आणि दीपक चाहरने (21) जोरदार फटकेबाजी करत भारताला 180 चा टप्पा पार करुन दिला.
Innings Breaks!
After electing to bat first, #TeamIndia post a total of 184/7 for New Zealand to chase.
Scorecard – https://t.co/MTGHRx2llF #INDvNZ @Paytm pic.twitter.com/wUGIfaNX2n
— BCCI (@BCCI) November 21, 2021
किशन, चहलचं पुनरागमन
टीम इंडियाने जयपूर आणि रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-20 मध्ये विजय मिळवून मालिकेवर कब्जा केला आहे. अशा परिस्थितीत आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये खेळणाऱ्या टीम इंडियाच्या नजरा किवी संघाला व्हाईटवॉश देण्यावर असतील. भारताने आजच्या सामन्यात आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत, भारतीय संघाने केएल राहुल आणि आर. अश्विनला विश्रांती दिली आहे. त्यांच्या जागी इशान किशन आणि युजवेंद्र चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. टीम साऊदीच्या जागी लॉकी फर्ग्युसनला न्यूझीलंड संघात स्थान मिळाले आहे. न्यूझीलंड संघाने कर्णधार बदलला आहे. तिसर्या आणि शेवटच्या T20 मध्ये न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या हातात आहे. यापूर्वी टिम साऊदी संघाची धुरा सांभाळत होता.
FIFTY for the Skipper ??@ImRo45 brings up his 26th T20I half-century in 27 deliveries.
Live – https://t.co/kbSRlDEQf1 #INDvNZ @Paytm pic.twitter.com/UZAFjUssw5
— BCCI (@BCCI) November 21, 2021
इतर बातम्या
महेंद्रसिंह धोनी शेवटचा सामना चेन्नईमध्ये खेळणार ? कार्यक्रमात बोलताना म्हणाला…
(IND vs NZ 3rd T20 : Rohit Sharma’s half century, India challenge New Zealand 185 runs)