IND vs NZ : तिसऱ्या कसोटीआधी टीमला झटका, दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे बाहेर
India vs New Zealand 3rd Test : न्यूझीलंड क्रिकेट टीम या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये 1 नोव्हेंबरपासून खेळवण्यात येणार आहे.
न्यूझीलंड क्रिकेट टीमने आतापर्यंत भारत दौऱ्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. न्यूझीलंड टीम इंडियाविरुद्ध 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. न्यूझीलंडने पुणे कसोटीत विजय मिळवून मालिका जिंकली. त्यानंतर आता न्यूझीलंड टीम इंडियाला व्हाईटवॉश करण्याच्या हेतूनं मैदानात उतरणार आहे. तिसरा आणि अंतिम सामना हा 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधी न्यूझीलंडला झटका लागला आहे. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार केन विलियमसन तिसऱ्या सामन्यातही खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. केन याआधी दुखापतीमुळे पहिल्या 2 सामन्यातही खेळू शकला नव्हता.
न्यूझीलंड क्रिकेटने सोशल मीडियावरुन केन विलियमसन तिसऱ्या कसोटीसाठी भारत दौऱ्यावर येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच केन आता थेट इंग्लंड विरूद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेपर्यंत या दुखापतीतून बरा होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. न्यूझीलंड मायदेशात इंग्लंड विरुद्ध 28 नोव्हेंबरपासून कसोटी मालिका खेळणार आहे.
केनला ग्रोईन इंजरीमुळे भारत दौऱ्याला मुकावं लागलं आहे. केनला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ही दुखापत झाली होती. याआधी केन भारत-न्यूझीलंड कसोटीमालिकेदरम्यान संघासोबत जोडला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता त्याला तिसऱ्या सामन्यासाठीही येता येणार नाहीय. तसेच आता न्यूझीलंडने मालिका जिंकली आहे. त्यामुळे केनला भारत दौऱ्यावर न पाठवण्याचा निर्णय घेतल्याचंही म्हटलं जात आहे.
केन दुखापतीमुळे भारत दौऱ्याला मुकला
Squad News | Kane Williamson will not travel to India for the third Test in Mumbai to ensure he his fit for the upcoming three-Test series against England 🏏 #CricketNationhttps://t.co/HpqP4w6Ufp
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 29, 2024
तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर.
तिसऱ्या सामन्यासाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, इश सोढी, टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.