IND vs NZ : अक्षर पटेलकडून न्यूझीलंडचा ‘पंच’नामा, किवी संघ 296 धावांत गारद, भारताला 49 धावांची आघाडी

न्यूझीलंडच्या सलामीवीरांव्यतिरिक्त एकाही किवी फलंदाजाला मोठी खेळी उभारता आली नाही. आज सकाळच्या सत्रात रवीचंद्रन अश्विनने आक्रमक विल यंग याला 89 धावांवर असताना बाद करत भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला.

IND vs NZ : अक्षर पटेलकडून न्यूझीलंडचा 'पंच'नामा, किवी संघ 296 धावांत गारद, भारताला 49 धावांची आघाडी
Axar Patel
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 4:22 PM

कानपूर : भारतीय संघाला पहिल्या डावात 345 धावांवर रोखल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने धमाकेदार सुरुवात केली होती. न्यूझीलंडने काल एकही गडी न गमावता 57 षटकांमध्ये 129 धावांपर्यंत मजल मारली होती.  मात्र आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगलंच पुनरागमन केलं. भारतीय गोलंदाजांनी किवी संघाचा डाव 142.3 षटकांमध्ये 296 धावांवर रोखला. त्यामुळे टीम इंडियाला 49 धावांची नाममात्र आघाडी मिळाली आहे. (IND vs NZ : Axar Patel took 5 wickets, Ashwin dismissed 3, New Zealand’s first innings ended at 296 runs)

न्यूझीलंडच्या सलामीवीरांव्यतिरिक्त एकाही किवी फलंदाजाला मोठी खेळी उभारता आली नाही. आज सकाळच्या सत्रात रवीचंद्रन अश्विनने आक्रमक विल यंग याला 89 धावांवर असताना बाद करत भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यंगने 214 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने ही खेळी उभारली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने एकेका किवी फलंदाजाला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. याचदरम्यान, खेळपट्टीला चिकटून बसलेल्या टॉम लॅथम याला अक्षर पटेलने बाद केलं. लॅथमने 282 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 95 धावांची खेळी केली. तर कर्णधार केन विलियम्सन (18), रॉस टेलर (11), हेन्री निकोलस (2), टॉम ब्लंडेल (13), रचिन रवींद्र (13) हे फलंदाज केवळ हजेरी लावून गेले. तसेच गोलंदाजांनादेखील काही चांगली कामगिरी करता आली नाही. काईल जेमिसनने 23 धावांचं योगदान दिलं.

अक्षर पटेलचा ‘पंच’

दरम्यान, भारताकडून फिरकीपटू अक्षर पटेलने सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने 34 षटकांपैकी 6 षटकं निर्धाव टाकत 62 धावा दिल्या, बदल्यात न्यूझीलंडचे 5 फलंदाज बाद केले. त्याला रवी अश्विननने 3 बळी घेत चांगली साथ दिली. उमेश यादवने धोकादायक केन विलियम्सनला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर रवींद्र जाडेजाने एक विकेट घेतली.

भारताचा पहिला डाव

तत्पूर्वी गुरुवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर टीम इंडियाचा पहिला डाव 345 धावांवर आटोपला. श्रेयस अय्यरचं शतक, शुभमन गिल आणि रवींद्र जाडेजाची अर्धशतकं यांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 345 धावांपर्यंत मजल मारली. अय्यर 105, शुभमन गिल 52, रवींद्र जाडेजा 50 आणि आर आश्विननं 38 धावांचं योगदान दिलं. न्यूझीलंडकडून टिम साऊथीने 5, काईल जेमिसनने 3 आणि एजाज पटेलने 2 विकेट घेतल्या.

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे पुन्हा फेल

चेतेश्वर पुजारा (26) आणि कॅप्टन अजिंक्य रहाणे (35) यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असताना दोघे पुन्हा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. दोघांनी चांगली सुरुवात करुन देखील त्याचं रुपांतर मोठ्या धावसंख्येत त्यांना करता आलं नाही.

इतर बातम्या

Rahul chahar : भर मैदानात अंपायरवर का भडकला राहुल चहर? राहुल चहरनं अंपायसमोर केलं हे कृत्य…

Virat kohli : विराट कोहलीचा आणि युजवेंद्र चहलच्या बायकोचा हा नाद खुळा डान्स पहा, व्हिडिओ तुफान व्हायरल

Ind vs nz test series : दुसऱ्या कसोटीत कुणाला बाहेर बसावं लागणार? कोण मैदानात असणार?

(IND vs NZ : Axar Patel took 5 wickets, Ashwin dismissed 3, New Zealand’s first innings ended at 296 runs)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.