Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : टीम इंडियाची भिंत ढासळतेय, चेतेश्वर पुजाराला मुंबई कसोटीतून डच्चू मिळणार?

कानपूर कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने पहिल्या डावात 26 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात तो 22 धावा करुन बाद झाला. दोन्ही डावात मिळून तो केवळ 48 धावांचं योगदान देऊ शकला.

IND vs NZ : टीम इंडियाची भिंत ढासळतेय, चेतेश्वर पुजाराला मुंबई कसोटीतून डच्चू मिळणार?
Cheteshwar pujara
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 1:13 PM

मुंबई : कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. हा कसोटी सामना भारताच्या अनेक खेळाडूंसाठी महत्त्वाचा आहे. देशातील अनेक मोठे खेळाडू या मालिकेसाठी उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक नवीन खेळाडूंना या सामन्यात संधी मिळाली आहे, ज्यांना स्वत:ला सिद्ध करायचे आहे. तरुणांसोबतच संघातील अनुभवी खेळाडू आणि सध्याचा उपकर्णधार चेतेश्वर पुजारासाठीही हा सामना खूप महत्त्वाचा आहे. खराब फॉर्ममुळे पुजारा बऱ्याच दिवसांपासून टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. कानपूर कसोटीतही तो अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता त्याच्यावर अधिक टीका होऊ लागली आहे. रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत तो संघाची जबाबदारी घेईल अशी अपेक्षा होती, पण पुजारा दोन्ही डावात अपयशी ठरला. त्यामुळे आता संघातील त्याचं स्थान धोक्यात आलं आहे. (IND vs NZ : Cheteshwar pujara once again flop in test, can be dropped from Mumbai Test)

पुजाराने पहिल्या डावात 26 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात तो 22 धावा करुन बाद झाला. दोन्ही डावात मिळून तो केवळ 48 धावांचं योगदान देऊ शकला. त्याहूनही अधिक म्हणजे, संघाला त्याची सर्वाधिक गरज असताना पुजाराने त्याची विकेट गमावली. 2021 मध्ये पुजाराची आकडेवारी चांगली राहिलेली नाही. ही आकडेवारी पाहता त्याचा धावांचा दुष्काळ स्पष्टपणे दिसून येतो. 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांच्या 21 डावांमध्ये त्याने 30.42 च्या सरासरीने एकूण 639 धावा केल्या आहेत. त्याने 50, 77, 25, 56, 73, 15, 21, 7, 0, 17, 8, 15, 4, 12, 9, 45, 1, 91, 4, 61, 26, 22 धावांच्या खेळी खेळल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने दोन अर्धशतके झळकावली पण तेव्हापासून त्याची बॅट शांत आहे. त्याच्या बॅटमधून बरेच दिवस शतक झाले नाही. पुजाराने 2019 मध्ये शेवटचे शतक झळकावले होते. 2019 मध्ये अॅडलेडमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे शतक झळकावले होते. त्या सामन्यात पुजाराने 193 धावा केल्या होत्या.

अय्यरकडून आव्हान

गेल्या दोन वर्षांमधील पुजाराची कामगिरी पाहता त्याचं संघातील स्थान धोक्यात आलं आहे. तसेच श्रेयस अय्यरनेही आव्हान निर्माण केलं आहे. अय्यरने कानपूर कसोटीत पदार्पण केले आणि पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात शतक झळकावले. कसोटीत पुजाराच्या जागी भारताला अय्यरचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय सूर्यकुमार यादवही पुजाराला आव्हान देत आहे. यादव हा मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा भाग आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याला संघात स्थान मिळाले आहे, मात्र त्याने अद्याप पदार्पण केलेले नाही.

पुजाराला मुंबईत होणाऱ्या पुढील कसोटी सामन्यात संघात स्थान मिळणे कठीण आहे. कारण त्या सामन्यात विराट कोहली पुनरागमन करेल, त्यामुळे त्याला संघात स्थान मिळवावे लागेल. अय्यरने शतक झळकावल्यामुळे त्याला पुढच्या सामन्यात स्थान मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात संघाचे नेतृत्व करणाऱ्या पुजारा किंवा अजिंक्य रहाणे या दोघांपैकी एकाला वगळले जाऊ शकते. पुजाराची अवस्था जवळपास रहाणेसारखीच आहे. तो खराब फॉर्मशीही झुंजत असून अय्यर या दोघांसाठी आव्हान ठरत आहे.

इतर बातम्या

Gautam gambhir : भाजप खासदार गौतम गंभीर यांना तिसऱ्यांदा गंभीर धमकी, ISIS चे खबरी दिल्ली पोलिसांत?

IND vs NZ: तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने विकेटकीपर बदलला, ऋद्धिमान साहा दुखापतग्रस्त, भारत अडचणीत

IND vs NZ : भर मैदानात अश्विन आणि पंचांमध्ये वाद, कोच राहुल द्रविड थेट मॅच रेफरींच्या केबिनमध्ये

(IND vs NZ : Cheteshwar pujara once again flop in test, can be dropped from Mumbai Test)

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.