IND vs NZ : कोलकाता T20 मध्ये टीम इंडिया नव्या सलामीवीरासह मैदानात उतरणार, अशी असेल Playing 11
तिसर्या टी-20 मध्ये भारतीय संघ 4 बदलांसह मैदानात उतरु शकतो, असे मानले जात आहे. टीम इंडियाच्या ओपनिंगमध्ये बदल होऊ शकतो आणि केएल राहुलला विश्रांती दिली जाऊ शकते.
कोलकाता : टीम इंडियाने जयपूर येथील पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडला धूळ चारली. त्यानंतर रांची येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यातदेखील विजय मिळवत मालिका खिशात घातली आहे. रोहित शर्माच्या टीमला न्यूझीलंडच्या टीमला व्हाईट वॉश देण्याची संधी आहे. आज टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध तिसरा आणि शेवटचा T20 (India vs New Zealand, 3rd T20I) सामना कोलकाता येथे खेळणार आहे. ईडन गार्डन्सवर खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकते. रोहित शर्मानेही दुसऱ्या टी-20 मधील विजयानंतर याचे संकेत दिले होते. पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये संधी न मिळालेल्या खेळाडूंना शेवटच्या सामन्यात खेळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे मानले जात आहे. (IND vs NZ : Indias predicted playing 11 for 3rd t20 against New Zealand, Ruturaj Gaikwad will open)
तिसर्या टी-20 मध्ये भारतीय संघ 4 बदलांसह मैदानात उतरु शकतो, असे मानले जात आहे. टीम इंडियाच्या ओपनिंगमध्ये बदल होऊ शकतो आणि केएल राहुलला विश्रांती दिली जाऊ शकते. त्यांच्या जागी ऋतुराज गायकवाड याला संधी दिली जाऊ शकते. आर अश्विन, भुवनेश्वर कुमार या दोन गोलंदाजांनाही विश्रांती दिली जाऊ शकते. या दोघांच्या जागी युजवेंद्र चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारच्या जागी आवेश खानला पदार्पणाची संधी मिळू शकते.
ऋषभ पंतच्या जागी इशान किशनला संधी
भारतीय संघ तिसर्या T20 मध्ये ऋषभ पंतलाही विश्रांती देऊ शकतो. पंत आयपीएलपासून सतत क्रिकेट खेळत आहे. त्याने टी-20 विश्वचषकातील सर्व सामने खेळले आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये तो खेळला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. पंतने विश्रांती घेतल्यास त्याच्या जागी इशान किशनला संधी मिळू शकते.
भारताचे संभाव्य Playing 11 : रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, इशान किशन, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, दीपक चहर, हर्षल पटेल आणि आवेश खान.
न्यूझीलंडची संभाव्य Playing 11: मार्टिन गप्टिल, डॅरेल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सायफर्ट, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, ईश सोढी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
इतर बातम्या
महेंद्रसिंह धोनी शेवटचा सामना चेन्नईमध्ये खेळणार ? कार्यक्रमात बोलताना म्हणाला…
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धची मालिका भारताच्या खिशात, दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा शानदार विजय
(IND vs NZ : Indias predicted playing 11 for 3rd t20 against New Zealand, Ruturaj Gaikwad will open)