IND vs NZ Live Score, 3rd T20 : भारताची टिच्चून गोलंदाजी, न्यूझीलंडचा संघ 111 धावांत ढेपाळला, भारताचा शानदार विजय

| Updated on: Nov 23, 2021 | 6:53 AM

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज कोलकाता येथील ऐतिहासिक स्टेडियम ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे.

IND vs NZ Live Score, 3rd T20 : भारताची टिच्चून गोलंदाजी, न्यूझीलंडचा संघ 111 धावांत ढेपाळला, भारताचा शानदार विजय
IND vs NZ Live Score

कोलकाता : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील तीन टी-20 सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकत भारताने न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज कोलकाता येथील ऐतिहासिक स्टेडियम ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला घेतला होता. प्रथम फलंदाजी करत भारताने 184 धावांचा डोंगर उभा केला होता. त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या न्यूझीलंला केवळ 111 धावांपर्यंत मजल मारला आली. त्यामुळे भारताना हा सामना 73 धावांनी जिंकला आहे. या विजयासह भारताने मालिका खिशात घातली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Nov 2021 10:31 PM (IST)

    न्यूझीलंडचा 10 वा गडी बाद

    न्यूझीलंडचा 9 वा गडी बाद झाला आहे. दीपक चाहरने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपत लॉकी फर्ग्युसनला (14) पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (111/10)

  • 21 Nov 2021 10:24 PM (IST)

    न्यूझीलंडचा 9 वा गडी माघारी, इश सोढी 9 धावांवर बाद

    न्यूझीलंडचा 9 वा गडी माघारी परतला आहे, हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने शानदार झेल टिपत इश सोढीला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (95/9)

  • 21 Nov 2021 10:21 PM (IST)

    भारताला आठवं यश, अॅडम निल्न 7 धावांवर बाद

    न्यूझीलंडचा आठवा फलंदाज माघारी परतला आहे, वेंकटेश अय्यरच्या गोलंदाजीवर कर्णधार रोहित शर्माने सोपा झेल टिपत अॅडम निल्न याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (न्यूझीलंड 93/8)

  • 21 Nov 2021 10:12 PM (IST)

    भारताला सातवं यश, मिचेल सँटनर 2 धावांवर बाद

    न्यूझीलंडचा सातवा फलंदाज माघारी परतला आहे, इशान किशनने मिचेल सँटनरला 2 धावांवर असताना धावबाद केलं (84/7)

  • 21 Nov 2021 10:09 PM (IST)

    न्यूझीलंडचा सहावा गडी माघारी, जिमी निशम 3 धावांवर बाद

    न्यूझीलंडचा सहावा गडी माघारी परतला आहे, हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने शानदार झेल टिपत जिमी निशमला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (76/6)

  • 21 Nov 2021 10:03 PM (IST)

    न्यूझीलंडचा पाचवा गडी माघारी, टिम सायफर्ट 17 धावांवर बाद

    न्यूझीलंडचा पाचवा गडी माघारी परतला आहे, इशान किशनने टिम सायफर्टला 17 धावांवर असताना धावबाद केलं (76/5)

  • 21 Nov 2021 09:30 PM (IST)

    ग्लेन फिलिप्स तंबूत परतला, चार चेंडूत शून्य धावा

    न्यूझीलंडचा खेळाडू  ग्लेन फिलिप्स बाद झाला आहे.

    एकूण चार चेंडू खेळून त्याला एकही धाव करता आलेली नाही.

  • 21 Nov 2021 09:18 PM (IST)

    भारताला दुसरं यश, डॅरेल मिशेलपाठोपाठ मार्क चॅपमन माघारी

    भारताला तिसऱ्या षटकात आणखी एक यश मिळालं आहे. अक्सर पटेलने मार्क चॅपमनला (0) माघारी धाडलं. ऋषभ पंतने त्याला यष्टीचित केलं. (न्यूझीलंड 21/1)

  • 21 Nov 2021 09:16 PM (IST)

    भारताला पहिलं यश, डॅरेल मिशेल 5 धावांवर बाद

    भारताला तिसऱ्या षटकात पहिलं यश मिळालं आहे. अक्सर पटेलने डॅरेल मिशेलला 5 धावांवर असताना हर्षल पटेलकरवी झेलबाद केलं. (न्यूझीलंड 21/1)

  • 21 Nov 2021 09:14 PM (IST)

    न्यूझीलंडची आक्रमक सुरुवात, दोन षटकात 21 धावा

    न्यूझीलंडने आक्रमक सुरुवात केली आहे. त्यांच्या सलामीवीरांनी दोन षटकात 21 धावा फटकावल्या आहेत. दुसऱ्या षटकात मार्टिन गप्टिल आणि डॅरेल मिचेलने दोन चौकार आणि एक षटकार लगावत 16 धावा फटकावल्या.

  • 21 Nov 2021 08:48 PM (IST)

    भारताचा सातवा गडी माघारी, हर्षल पटेल 18 धावांवर बाद

    भारताने सातवी विकेट गमावली आहे. हर्षल पटेल 18 धावा करुन माघारी परतला. लॉकी फर्ग्युसनने त्याला बाद केलं. (भारत 162/6)

  • 21 Nov 2021 08:29 PM (IST)

    भारताला सहावा धक्का, श्रेयस अय्यर 25 धावांवर बाद

    भारताने सहावी विकेट गमावली आहे. श्रेयस अय्यर 25 धावा करुन माघारी परतला. अॅडम मिल्ने याने त्याला डॅरेल मिचेलकरवी झेलबाद केलं. (भारत 140/6)

  • 21 Nov 2021 08:25 PM (IST)

    भारताला पाचवा धक्का, वेंकटेश अय्यर 20 धावांवर बाद

    भारताने पाचवी विकेट गमावली आहे. वेंकटेश अय्यर 20 धावा करुन माघारी परतला. ट्रेंट बोल्टने त्याला मार्क चॅपमनकरवी झेलबाद केलं. (भारत 139/5)

  • 21 Nov 2021 08:02 PM (IST)

    भारताला चौथा धकका, 56 धावा करुन रोहित शर्मा माघारी

    भारताने चौथी विकेट गमावली आहे. कर्णधार रोहित शर्मा 56 धावा करुन रोहित माघारी परतला. इश सोढीने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल घेत रोहितला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

  • 21 Nov 2021 07:59 PM (IST)

    रोहित शर्माची फटकेबाजी, 27 चेंडूत अर्धशतक

    रोहित शर्माने आजच्या सामन्यात पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्याने जोरदार फटकेबाजी करत 27 चेंडूत अर्धशतक फटकावलं. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 3 षटकार लगावले. मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर चौकार लगावत त्याने अर्धशतक पूर्ण केलं.

  • 21 Nov 2021 07:55 PM (IST)

    सातारा जिल्हा मध्यवर्ती निवडणुकीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 96.33% मतदान 

    सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती निवडणुकीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 96.33% मतदान

    जिल्ह्यात 1,964 मतदारांपैकी 1,892 मतदारांनी आपला हक्क बजावला

    सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, आमदार शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा लागली पणाला

    23 नोव्हेंबरला होणार मतमोजणी

  • 21 Nov 2021 07:49 PM (IST)

    भारताला तिसरा धक्का, सूर्यकुमार पाठोपाठ ऋषभ पंत माघारी

    भारताने तिसरी विकेट गमावली आहे. मिचेल सँटनरने ऋषभ पंतला (04) जिमी निशमकरवी झेलबाद केलं. (भारत 71/2)

  • 21 Nov 2021 07:45 PM (IST)

    भारताला दुसरा धक्का, सूर्यकुमार यादव शून्यावर बाद

    भारताने दुसरी विकेट गमावली आहे. मिचेल सँटनरने सूर्यकुमार यादवला मार्टिन गप्टीलकरवी झेलबाद केलं. (भारत 71/2)

  • 21 Nov 2021 07:36 PM (IST)

    भारताला पहिला धक्का, इशान किशन 29 धावांवर बाद

    भारताने पहिली विकेट गमावली आहे. मिचेल सँटनरने इशान किशनला (29) टिम सायफर्टकरवी झेलबाद केलं. (भारत 69/1)

  • 21 Nov 2021 07:34 PM (IST)

    रोहित-इशानची फटकेबाजी, 6 षटकात भारताच्या 69 धावा

    सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोघांनी जोरदार फटकेबाजी करत पॉवर प्लेमध्ये 69 धावा कुटल्या आहेत. 6 व्या षटकात या जोडीने 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 20 धावा फटकावल्या.

  • 21 Nov 2021 07:23 PM (IST)

    रोहितचा दुसरा षटकार

    चौथ्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या लॉकी फर्ग्युसनच्या दुसऱ्याच चेंडूवर रोहित शर्माने शानदार षटकार लगावला. भारत 39/0 (4 षटकं)

  • 21 Nov 2021 07:21 PM (IST)

    भारताची आश्वासक सुरुवात, 3 षटकात 29 धावा

    भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशनने संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली आहे. दोघांनी सुरुवातीची 3 षटकात 29 धावा जमवल्या आहेत.

  • 21 Nov 2021 06:55 PM (IST)

    नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजी करण्याचा निर्णय

    भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 21 Nov 2021 06:54 PM (IST)

    भारताची प्लेइंग इलेव्हन : इशान आणि चहल इन, राहुल आणि अश्विन आऊट

    रोहित शर्मा (कर्णधार)

    इशान किशन

    सूर्यकुमार यादव

    श्रेयस अय्यर

    ऋषभ पंत (यष्टीरक्षक)

    व्यंकटेश अय्यर

    अक्षर पटेल

    युजवेंद्र चहल

    भुवनेश्वर कुमार

    दीपक चहर

    हर्षल पटेल

  • 21 Nov 2021 06:54 PM (IST)

    न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन : साऊदी आऊट, फर्ग्युसन इन

    मिचेल सँटनर (कर्णधार)

    मार्टिन गप्टिल

    डॅरिल मिशेल

    मार्क चॅपमन

    टिम साफर्ट (यष्टीरक्षक)

    ग्लेन फिलिप्स

    जेम्स नीशम

    लॉकी फर्ग्युसन

    इश सोढी

    ट्रेंट बोल्ट

    अॅडम मिल्ने

Published On - Nov 21,2021 6:50 PM

Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.