IND vs NZ : रांचीचं ‘रण’ जिंकण्यासाठी न्यूझीलंडने टीम बदलली, भारताकडून एका खेळाडूचं पदार्पण
रांचीचं ‘रण’ जिंकण्यासाठी न्यूझीलंडने टीममध्ये बदल केले आहेत. तसेच भारताकडून एका खेळाडूचं पदार्पण होत आहे. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे.
रांची : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज T-20 मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेतील पहिला सामना जयपूरमध्ये खेळवला गेला होता, जो टीम इंडियाने पाच विकेट्सने जिंकला होता. आता ते मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहेत. न्यूझीलंडसाठी ही करो किंवा मरोची लढत आहे. अशा स्थितीत हा सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. (Ind vs NZ live score T20 World Cup 2021 Match Scorecard Marathi, Rohit Sharma vs Tim Southee)
3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने पुढे आहे. जयपूर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात भारताने किवी संघाचा 5 विकेट्सने पराभव केला होता. सूर्यकुमार यादव या सामन्यात भारताच्या विजयाचा हिरो ठरला होता, त्याने 40 चेंडूत 62 धावांची खेळी केली होती. प्रथम फलंदाजी न्यूझीलंडने जयपूर टी-20 मध्ये भारतासमोर 165 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे मेन इन ब्लूने 2 चेंडू राखून पूर्ण केले.
दरम्यान, रांचीचं ‘रण’ जिंकण्यासाठी न्यूझीलंडने टीममध्ये बदल केले आहेत. तसेच भारताकडून एका खेळाडूचं पदार्पण होत आहे. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. मोहम्मद सिराजच्या दुखापतीमुळे त्याच्या जागी आज हर्षल पटेलला संधी देण्यात आली आहे.
? ? Congratulations to @HarshalPatel23 who is set to make his #TeamIndia debut. ? ?@Paytm #INDvNZ pic.twitter.com/n9IIPXFJQ7
— BCCI (@BCCI) November 19, 2021
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
केएल राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ऋषभ यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल
A look at #TeamIndia‘s Playing XI for the 2nd @Paytm #INDvNZ T20I ?
Follow the match ▶️ https://t.co/9m3WflcL1Y pic.twitter.com/nuwL8gNFj1
— BCCI (@BCCI) November 19, 2021
न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन
मार्टिन गप्टिल, डॅरेल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम स्टायफर्ट, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट
? UPDATE: MD Siraj got a web split on his left hand while fielding on his own bowling in the 1st T20I in Jaipur.
The BCCI medical team is closely monitoring his progress.#TeamIndia @Paytm #INDvNZ pic.twitter.com/9h4RnRGfkb
— BCCI (@BCCI) November 19, 2021
इतर बातम्या
IND vs NZ: रोहित शर्माने डगआउटमध्ये जखमी मोहम्मद सिराजला मारलं, VIDEO व्हायरल
नाद करा पण आमचा कुठं! गप्टीलने डोळे दाखवले, दीपक चाहरने पुढच्या बॉलवर विकेट घेतली, पाहा VIDEO
(Ind vs NZ live score T20 World Cup 2021 Match Scorecard Marathi, Rohit Sharma vs Tim Southee)