IND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर ‘सचिन…सचिन…’चा जयघोष, पाहा नक्की काय झालं?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कसोटी सामना खेळवला जात आहे. आज (5 डिसेंबर) या सामन्याचा तिसरा दिवस आहे. आजच्या दिवसातील पहिल्या सत्रात प्रेक्षकांना एक अद्भुत नजारा पाहायला मिळाला.

IND vs NZ : शुभमन गिलचा खणखणीत चौकार, वानखेडेवर 'सचिन...सचिन...'चा जयघोष, पाहा नक्की काय झालं?
Shubhman gill
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 1:50 PM

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कसोटी सामना खेळवला जात आहे. आज (5 डिसेंबर) या सामन्याचा तिसरा दिवस आहे. आजच्या दिवसातील पहिल्या सत्रात प्रेक्षकांना एक अद्भुत नजारा पाहायला मिळाला. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज शुभमन गिलने नेहमीप्रमाणे चांगली खेळी केली. दरम्यान, पहिल्या सत्राच्या अखेरीस शुभमनने टिम साऊथीला एक शानदार चौकार लगावला, तेव्हा चाहत्यांनी स्टेडियममध्ये ‘सचिन…सचिन…’ असा जयघोष सुरू केला. (IND vs NZ : Mumbai crowd chants ‘Sachin Sachin’ after Shubman Gill smashes four to Tim Southee)

मुंबई कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजाराने भारताचा डाव पुढे नेला आणि टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीला येईल, अशी सर्वांना अपेक्षा होती, पण शुभमन गिल फलंदाजीला आला.

शुभमन गिलने शानदार फलंदाजी केली आणि मैदानावर आल्यापासून त्याने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्याने चौकार लगावताच चाहत्यांमध्ये उत्साह संचारला होता. शुभमन गिलच्या बाऊंड्रीवर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी ‘सचिन…सचिन…’ असा जयघोष सुरू केला.

व्हिडीओ पाहा

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना होत आहे आणि हे सचिन तेंडुलकरचे ते होम ग्राउंड आहे. या मैदानात सचिन तेंडुलकरच्या नावाने एक स्टँडही बनवण्यात आला आहे, वानखेडे स्टेडियम आणि सचिन या दोन गोष्टींशी क्रिकेटरसिक इमोश्नली जोडलेले आहेत. आज शुभमनने चौकार लगावल्यानंतर प्रेक्षक सचिनच्या नावाचा जयघोष करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.

दुखापतीमुळे सलामीला उतरला नाही

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना शुभमन गिलला दुखापत झाली होती, त्यानंतर बीसीसीआयकडून अपडेटही देण्यात आले होते. त्यामुळेच तो सलामीला आला नाही. मात्र आज तो मयंक अग्रवाल बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला.

सचिनकडून गिलचं कौतुक

शुबमन तंत्रशुद्ध खेळतो. कसोटीत कोणत्याही ठिकाणी बँटिंग करण्याची त्याच्यात क्षमता आहे. फक्त आता चांगल्या खेळीचं मोठ्या धावसंख्येत रुपांतर करण्याची वेळ आली आहे, असं सचिनने शनिवारी एका मुलाखतीदरम्यान नमूद केलं.

इतर बातम्या

Sara tendulkar : सचिनची मुलगी सारा तेंडुलकरच्या स्पेशल डेटची सोशल मीडियावर चर्चा

IND vs NZ : अवघ्या 62 धावांत न्यूझीलंडचा खुर्दा, पाहुण्यांच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

Thane : विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यांसाठी दादोजी कोंडदेव स्टेडियम सज्ज, 5 सामने खेळवले जाणार

(IND vs NZ : Mumbai crowd chants ‘Sachin Sachin’ after Shubman Gill smashes four to Tim Southee)

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...