INDvNZ : टीम इंडियात न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी घातक फलंदाजाची एन्ट्री

भारतीय क्रिकेट टीम विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेची सुरुवात बुधवार 18 जानेवारीपासून होणार आहे.

INDvNZ : टीम इंडियात न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी घातक फलंदाजाची एन्ट्री
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 4:55 PM

मुंबई : टीम इंडियाने श्रीलंकेचा टी 20 आणि वनडे सीरिजमध्ये सुपडा साफ केला. आता त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. वनडे सीरिजला बुधवार 18 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. त्याआधी टीम इंडियात एका घातक फलंदाजाची एन्ट्री झाली आहे. ज्यामुळे न्यूझीलंडच्या गोटात भीतीचं वातावरण आहे.

टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन श्रेयस अय्यरला वनडे सीरिजमधून माघार घ्यावी लागली. श्रेयस पाठीच्या दुखापतीमुळे वनडे सीरिजमध्ये खेळणार नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली. श्रेयसच्या जागी संघात युवा फलंदाज रजत पाटीदार याचा समावेश करण्यात आला आहे.

रजत पाटीदारचा टीम इंडियात समावेश होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. रजतने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत आपली छाप सोडली आहे. तसेच आयपीएलमध्येही त्याने शानदार कामगिरी केलीय.

हे सुद्धा वाचा

आयपीएल कारकीर्द

रजतने आयपीएलमध्ये आरसीबीचं प्रतिनिधित्व केलं आहे. रजतने आतापर्यंत एकूण 12 सामन्यांतील 11 डावात 1 शतक आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने 404 धावा केल्या आहेत. रजतने हे एकमेव शतक आयपीएल 2022 मध्ये लखनऊ विरुद्ध केलं होतं. रजतने तेव्हा 112 धावांची शतकी खेळी केली होती.

रणजी ट्रॉफी स्पर्धेतही धमाका

रजतने आयपीएलशिवाय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतही शानदार कामगिरी केली आहे. रजतने मध्य प्रदेशसाठी रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शतक ठोकलं होतं. रजत यासह स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. शिवाय रजतने 50 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3 हजार 668 धावा केल्या आहेत. यात 11 शतकांचा समावेश आहे. तर 51 लिस्ट ए करिअरमध्ये रजतच्या नावावर 1 हजार 648 धावा आहेत.

घरच्या मैदानात डेब्यू होणार?

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. रजत हा मूळचा इंदूरकर आहे. त्याला होळकर स्टेडियमच्या प्रत्येक कानाकोपऱ्याबाबत माहिती आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट रजतला घरच्या मैदानातून वनडे डेब्यू करण्याची संधी देऊ शकते.

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 18 जानेवारी, हैदराबाद

दुसरा सामना, 21 जानेवारी, रायपूर

तिसरा सामना, 24 जानेवारी, इंदूर

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.