Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : भर मैदानात अश्विन आणि पंचांमध्ये वाद, कोच राहुल द्रविड थेट मॅच रेफरींच्या केबिनमध्ये

वीचंद्रन अश्विन आणि वाद हे समीकरण ठरलेलंच आहे. तो कधी खेळाडू, तर कधी पंचांशी भिडल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. न्यूझीलंड विरुद्ध कानपूर येथे खेळवल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये (IND vs NZ Kanpur Test) असेच काहीसे घडले.

IND vs NZ : भर मैदानात अश्विन आणि पंचांमध्ये वाद, कोच राहुल द्रविड थेट मॅच रेफरींच्या केबिनमध्ये
R. Ashwin, umpire Nitin Menon and Ajinkya Rahane
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 3:36 PM

कानपूर : रवीचंद्रन अश्विन आणि वाद हे समीकरण ठरलेलंच आहे. तो कधी खेळाडू, तर कधी पंचांशी भिडल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. न्यूझीलंड विरुद्ध कानपूर येथे खेळवल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये (IND vs NZ Kanpur Test) असेच काहीसे घडले. वास्तविक, न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंगला बाद केल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. या प्रयत्नात अश्विनने एक नवीन युक्ती आजमावली आणि त्याने स्टंपच्या अगदी जवळ गोलंदाजी करायला सुरुवात केली. हे करत असताना तो नॉन-स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या अंपायर आणि फलंदाजासमोर अनेकवेळा आला. यावर अंपायर नितीन मेनन (Umpire Nitin Menon) नाराज झाले आणि त्यांनी अश्विनला यासाठी अनेकदा अडवले. (IND vs NZ: R. Ashwin and umpire Nitin Menon argue over his round-the-stumps run-up)

पंच नितीन मेनन यांची सूचना आर. अश्विनच्या लक्षात आली नाही आणि दोघांनी त्यावरून वाद घालण्यास सुरुवात केली. ही घटना न्यूझीलंडच्या डावाच्या 77 व्या षटकात घडली. हा वाद इथेच थांबला नाही. पुढील तीन षटके या मुद्द्यावर पंच आणि अश्विनमध्ये वाद सुरूच होता. वाद अधिकच वाढत असल्याचे पाहून कर्णधार अजिंक्य रहाणेलाही (Ajinkya Rahane) मध्यस्थी करावी लागली.

फॉलो-थ्रूमध्ये अश्विन त्यांच्यासमोर येत आहे आणि अशा स्थितीत त्यांना स्ट्राईकवर उभा असलेला फलंदाज दिसत नाही आणि कोणत्याही प्रकारचे अपील असल्यास त्यांना निर्णय देताना त्रास होईल, असा पंचांचा तर्क होता. तर अश्विनने असा युक्तिवाद केला की पंच त्याला गोलंदाजी करण्यापासून रोखत आहेत.

अश्विन आणि पंच यांच्यात जोरदार वादावादी

अश्विन वारंवार सांगत होता की, त्याने डेंजर एरियाशी (विकेटच्या समोरचा भाग) छेडछाड केली नाही. नियमानुसार कोणताही गोलंदाज त्याच्या फॉलो-थ्रूमध्ये डेंजर एरियात जाऊ शकत नाही. कारण असे केल्याने गोलंदाजाच्या बुटांच्या स्पाइकमुळे विकेट खराब होण्याची भीती असते.

राहुल द्रविडची मॅच रेफरींच्या केबिनकडे धाव

अंपायर मेनन आणि अश्विनचे ​​संभाषण कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मी जे काही करतोय, ते नियमात राहून करतोय, असे अश्विन सांगत होता. अश्विन आणि पंच मेनन यांच्यात मैदानावर वारंवार वाद होत असल्याचे पाहून प्रशिक्षक राहुल द्रविड याने थेट सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांच्या केबिनकडे धाव घेतली आणि या मुद्द्यावर दोघांमध्ये संभाषण झाले. या भेटीनंतर पुन्हा मैदानावर अंपायर आणि अश्विन यांच्यात वाद झाला नाही.

अश्विन आणि पंचांमधील संभाषण सोशल मीडियावर व्हायरल

Umpire: “You are obstructing my vision”

Rahane: “He’s not running on to the danger area.”

Umpire: “I can’t make the LBW calls.”

Ashwin: “You are anyways not making any”

इतर बातम्या

Rahul chahar : भर मैदानात अंपायरवर का भडकला राहुल चहर? राहुल चहरनं अंपायसमोर केलं हे कृत्य…

Virat kohli : विराट कोहलीचा आणि युजवेंद्र चहलच्या बायकोचा हा नाद खुळा डान्स पहा, व्हिडिओ तुफान व्हायरल

Ind vs nz test series : दुसऱ्या कसोटीत कुणाला बाहेर बसावं लागणार? कोण मैदानात असणार?

(IND vs NZ: R. Ashwin and umpire Nitin Menon argue over his round-the-stumps run-up)

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.