IND vs NZ T20 WC Warm up Matches Live Streaming: कधी, कुठे, कसा पाहू शकता भारत वि न्यूझीलंड सामना, जाणून घ्या डिटेल्स
IND vs NZ T20 WC Warm up Matches Live Streaming: एका क्लिकवर जाणून घ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे डिटेल्स.
ब्रिस्बेन: टीम इंडिया (Team India) आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 World Cup) सोमवारी आपली पहिली वॉर्म अप मॅच (Warm up Match) खेळली. त्यांनी या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. आता टीम इंडिया बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध दुसरा सराव सामना खेळणार आहे. पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाने शानदार खेळ दाखवला. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. दुसऱ्या वॉर्मअप मॅचमध्येही तीच लय कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल.
टीम इंडिया 23 ऑक्टोबरला वर्ल्ड कपमधला पहिला सामना खेळणार आहे. त्याआधी टीम इंडिया वॉर्मअप मॅचमध्ये दमदार खेळ दाखवण्याचा प्रयत्न करेल.
रोहित शर्मावर सगळ्यांच्या नजरा
न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या वॉर्मअप मॅचमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मावर नजर असेल. रोहितचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मागच्या सामन्यात रोहितने धीमी फलंदाजी केली. राहुल 49 धावांवर होता. त्यावेळी रोहितच्या खात्यात फक्त 1 रन्स होता.
कधी, कुठे आणि कशी पाहू शकता मॅच
भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी 20 वर्ल्डकपची वॉर्मअप मॅच कधी होणार आहे? भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी 20 वर्ल्ड कपची वॉर्मअप मॅच 19 ऑक्टोबरला होणार आहे.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी 20 वर्ल्ड कपची वॉर्मअप मॅच कुठे खेळली जाणार आहे? भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी 20 वर्ल्ड कपची वॉर्मअप मॅच ब्रिस्बेनमध्ये खेळली जाणार आहे.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी 20 वर्ल्ड कपची वॉर्मअप मॅच कधी सुरु होणार? भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी 20 वर्ल्ड कपची वॉर्म अप मॅच सकाळी 9.30 वाजता सुरु होईल.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप वॉर्मअप मॅचच लाइव टेलीकास्ट कुठे होणार? भारत आणि न्यूझीलंडमध्ये वॉर्मअप मॅचच लाइव टेलीकास्ट स्टार स्पोर्ट्स चॅनलच्या हिंदी, इंग्रजी, तेलुगु, तामिळ आणि कन्नड भाषेमध्ये होईल.
भारत आणि न्यूझीलंडमधल्या मॅचच लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे होणार? टीम इंडियाच्या वॉर्म अप मॅचच लाइव्ह स्ट्रीमिंह हॉटस्टारवर पाहता येईल.