ICC WWC 2022: ना झेल घेतला, ना बॉलिंग केली, तिरीही पूजा वस्त्राकरने काढली न्यूझीलंडची मोठी विकेट, पहा VIDEO

ICC WWC 2022: आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये (ICC Women’s World Cup) पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडिया अडचणीत सापडली होती. त्यावेळी पूजा वस्त्रकार (Pooja Vastrakar). संकटमोचक बनून टीमच्या मदतीला धावून आली होती.

ICC WWC 2022: ना झेल घेतला, ना बॉलिंग केली, तिरीही पूजा वस्त्राकरने काढली न्यूझीलंडची मोठी विकेट, पहा VIDEO
महिला वर्ल्डकप - भारत वि न्यूझीलंड Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 11:03 AM

हॅमिल्टन: आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये (ICC Women’s World Cup) पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडिया अडचणीत सापडली होती. त्यावेळी पूजा वस्त्रकार (Pooja Vastrakar). संकटमोचक बनून टीमच्या मदतीला धावून आली होती. आता न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातही तिने अशीच अष्टपैलू चमक दाखवली आहे. आजच्या सामन्यात मोठी विकेट मिळवून पूजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ही मोठी विकेट मिळवण्यासाठी तिने गोलंदाजी केली नाही किंवा झेलही घेतला नाही. फक्त कडक फिल्डिंगच्या बळावर पूजाने हे यश मिळवलं. पूजाने जबरदस्त फिल्डिंग करुन न्यूझीलंडची सलामीवीर सूजी बेट्सला (Suzie Bates) रनआऊट केलं. भारतीय टीमसाठी हा मोठा विकेट होता. कारण मागच्या बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात सूजी सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली होती. न्यूझीलंडकडून सूजी बेट्स आणि सोफिया डिवाइनची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरली होती. दोघींनी खेळपट्टीवर जम बसवण्याचा प्रयत्न केला. भारताला त्यावेळी लवकर एका विकेटची गरज होती. हे काम पूजा वस्त्रकारने केलं.

तिसऱ्याच ओव्हरमध्ये रनआऊट

पूजाने सामन्याच्या तिसऱ्याच ओव्हरमध्ये सूजी बेट्सला रनआऊट केलं आणि पहिलं यश मिळवून दिलं. झुलन गोस्वामी हे षटक टाकत होती. षटकातील पहिल्याच षटकात चोरटी धाव घेण्याचा सूजीने प्रयत्न केला. पण पूजाच्या अचूक थ्रो ने ती धावबाद झाली. पूजाने विकेटवर डायरेक्ट हिट करुन न्यूझीलंडची सलामीवीर सूजीला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. सूजीने फक्त पाच रन्स केल्या.

सूजीची विकेट लवकर मिळवणं आवश्यक होतं

बांग्लादेश विरुद्धच्या मागच्या सामन्यात सूजीने नाबाद 79 धावा केल्या होत्या. संघाला विजयी करण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारताविरुद्धच्या सामन्यातही ती चांगली कामगिरी करेल, असं वाटतं होतं. तिची विकेट लवकर मिळवणं आवश्यक होतं. त्यावेळी पूजा वस्त्रकारने आपलं काम चोख पार पडलं. मागच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही पूजा वस्त्राकारने महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. तिने अष्टपैलू खेळ दाखवला होता. आजही तिने तशीच कामगिरी केली. पाक विरुद्ध ऑलराऊंडर पूजा वस्त्रकारने 59 चेंडूत 67 धावांच्या खेळीत आठ चौकार फटकावले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.