IND vs NZ | भारत जिंकला, पण रोहितकडे ऑप्शन नव्हता, न्यूझीलंडने दाखवून दिल्या 2 मोठ्या कमतरता
IND vs NZ | टीम इंडियाने काल न्यूझीलंड विरुद्ध आरामात विजय मिळवला. भारतीय क्रिकेट चाहत्यांना याच मॅचच थोड टेन्शन होतं. भारतीय क्रिकेट टीमने विजय मिळवला. पण न्यूझीलंडने या सामन्यात टीम इंडियाच्या दोन मोठ्या कमतरता उघड केल्या.
धर्मशाळा : ज्या मॅचबद्दल भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात धाकधूक होती, ती मॅच टीम इंडियाने आरामात जिंकली. धर्मशाळामध्ये टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 मधील बलाढय न्यूझीलंवर 4 विकेट्सने विजय मिळवला. आयसीसी इवेंट्समध्ये अनेकदा न्यूझीलंडचा संघ टीम इंडियावर भारी पडला होता. टीम इंडियाने रविवारी ती कसर भरुन काढली. आरामात हा अडथळा पार केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची दमदार वाटचाल सुरु आहे. टीम इंडियाने आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यात आरामात विजय मिळवलाय. न्यूझीलंड विरुद्ध जिंकलो असलो, तरी एक कमजोरी दिसून आली. त्यावर तोडगा काढण आवश्यक आहे.
मागच्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सारख्या मजबूत टीम्सवर विजय मिळवला होता. अफगाणिस्तान आणि बांग्लादेश या कधीही धक्का देऊ शकणाऱ्या संघांविरुद्धही आरामात सामना जिंकला. चारही मॅचमध्ये टीम इंडिया पूर्ण ताकतीने आणि संतुलित प्लेइंग इलेव्हनसह उतरली होती. न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात मात्र असं झालं नाही. कारण ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दुखापतीमुळे या मॅचमध्ये खेळत नव्हता. इथूनच टीम इंडियाची कमतरता दिसून आली.
टीम इंडियाकडे कुठला ऑप्शन नव्हता?
धर्मशाळाच्या सामन्यात हार्दिक खेळत नसल्याने टीम इंडियाला दोन प्लेयरसना स्थान द्याव लागलं. फलंदाजीसाठी सूर्यकुमार यादव आणि नियमित गोलंदाज म्हणून मोहम्मद शमीचा टीममध्ये समावेश केला. परिणामी टीम इंडिया फक्त 5 गोलंदाजांसह खेळत होती. टॉप ऑर्डरमधील एकही फलंदाज कामचलाऊ गोलंदाजी करणारा नव्हता. उदहारणार्थ सेहवाग, सचिन तेंडुलकर. हे दोघे फलंदाजी बरोबर ऑफस्पिन गोलंदाजी करायचे. त्यामुळेच न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया बराचवेळ बॅकफूटवर होती.
रोहितच्या चेहऱ्यावर टेन्शन का होतं?
न्यूझीलंडकडून रचिन रविंद्र आणि डेरिल मिचेलने हल्लाबोल केला. पण टीम इंडियाकडे सहाव्या गोलंदाजाचा पर्याय नव्हता. रविंद्र आणि मिचेल दरम्यान 159 धावांची भागीदारी झाली. खासकरुन कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर धावा वसूल करण्यात आल्या. त्यावेळी कॅप्टन रोहित शर्माच्या चेहऱ्यावर स्पष्ट टेन्शन दिसून आलं. शेवटच्या 10 ओव्हर्समध्ये टीम इंडियाने कमबॅक केलं, ही वेगळी गोष्ट आहे. न्यूझीलंडच्या टीमला 300 धावसंख्येपर्यंत पोहोचण्यापासून रोखलं. अखेरीस हीच बाब महत्त्वाची ठरली. या परिस्थितीनंतर टीम इंडियाला एका अतिरिक्त गोलंदाज खेळवावा लागेल. आणखी एका ऑलराऊंडरचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला पाहिजे. न्यूझीलंडने इतर टीम्सना भारताविरुद्ध कुठला महत्त्वाचा फॉर्म्युला दिला?
टीम इंडियाला कसं बॅकफूटवर ढकलायच तो फॉर्म्युला सुद्धा न्यूझीलंडने इतर टीम्सना दिला. स्पिनर विरुद्ध अटॅक. मागच्या चार सामन्यात रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादवने मधल्या ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी टीमच्या बॅटिंगची वाट लावलीय. यावेळी असं होऊ शकल नाही, कारण कुलदीप विरुद्ध किवी फलंदाज आक्रमक झाले. मिचेल आणि रविंद्रने मिळून कुलदीपला 4 सिक्स मारले. यात 3 सिक्स दोन ओव्हर्समध्ये मारले. एकवेळ कुलदीपने 5 ओव्हर्समध्ये 48 धावा दिल्या होत्या. विकेटही त्याच्या नावावर नव्हता. त्यानंतर कुलदीपने कमबॅक केलं. 5 ओव्हर्समध्ये 25 धावा देऊन 2 विकेट काढल्या. मात्र, तरीही न्यूझीलंडने अन्य टीम्सना मार्ग दाखवलाय.