Asia Cup 2022: भारताकडून 3 वेळा पाकिस्तानचा होऊ शकतो पराभव, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसं?
आशिया कप (Asia Cup) स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या टीम्सनी आपआपले संघ निवडले आहेत. अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका (AFG vs SL) सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होईल.
मुंबई: आशिया कप (Asia Cup) स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या टीम्सनी आपआपले संघ निवडले आहेत. अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका (AFG vs SL) सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होईल. भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना 28 ऑगस्टला होईल. या मॅचवर जगभरातील क्रिकेट प्रेमींची नजर असेल. आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ तीन वेळा आमने-सामने येऊ शकतात.
IND vs PAK: 28 ऑगस्टला पहिला सामना
आशिया कप स्पर्धा 27 ऑगस्टला सुरु होऊन 11 सप्टेंबरपर्यंत चालेल. पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या संघात होईल. दुसऱ्यादिवशी 28 ऑगस्टला भारत-पाकिस्तान संघ आमने-सामने येतील.
IND vs PAK: 4 सप्टेंबरला होऊ शकतो दुसरा सामना
28 ऑगस्टला पहिला सामना होईल. त्यानंतर 4 सप्टेंबरला सुपर फोर राऊंड मध्ये दोन्ही संघ आमने-सामने येऊ शकतात. कारण भारत-पाकिस्तान दोन्ही संघ ग्रुप ए मध्ये आहेत. हे दोन्ही संघ ग्रुप मध्ये टॉपवर राहू शकतात. त्यामुळे त्यांच्यात सामना होईल.
IND vs PAK: 11 सप्टेंबरला फायनल मध्ये होऊ शकतो आमना-सामना
आशिया कपच्या फायनल मध्ये हे दोन संघ पोहोचू शकतात. फायनल मॅच 11 सप्टेंबरला होणार आहे. त्यावेळी हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमने-सामने येऊ शकतात. आशियातील हे दोन्ही बलाढ्य संघ असून दोन्ही टीम्स चांगल्या फॉर्म मध्ये आहेत.
कुठे आणि किती वाजता होणार सामने?
भारत-पाकिस्तान मध्ये आशिया कप मध्ये तीन सामने झाले, तर त्या मॅच कुठे होतील?. यावेळी आशिया कपचे दुबई मध्ये आयोजन करण्यात आलं आहे. संध्याकाळी 7 वाजता हे तिन्ही सामने सुरु होतील.