IND vs PAK : ‘भारताची बॉलिंग आणि पाकिस्तानचे 66/4…’, इरफान कॅप्टनशिपवरुन बाबरला झोंबणार बोलला

IND vs PAK : इरफान पठानने बाबर आजमच्या कॅप्टनशिपमधील मोठी चूक दाखवून दिली. त्या स्थितीमध्ये बाबर आजमच्या जागी रोहित शर्मा असता, तर त्याने काय केलं असतं? आणि बाबर आजमने काय चूक केली? ती इरफान पठानने दाखवून दिलीय.

IND vs PAK : 'भारताची बॉलिंग आणि पाकिस्तानचे 66/4...', इरफान कॅप्टनशिपवरुन बाबरला झोंबणार बोलला
ind vs pak asia cup 2023
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 11:08 AM

कँडी : भारत आणि पाकिस्तान हे क्रिकेटच्या मैदानातील पारंपारिक प्रतिस्पर्धी. शनिवारी आशिया कप 2023 च्या निमित्ताने दोन्ही टीम्स आमने-सामने आल्या होत्या. सर्वांनाच या लढतीची उत्सुक्ता होती. पण या मॅचमध्ये पावसाने बाजी मारली. पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. फक्त टीम इंडियाचा फलंदाजीचा सराव झाला. 48.5 ओव्हर्समध्ये टीम इंडिया 266 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठानने बाबर आजमच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. उलट कँडीमध्ये झालेल्या पावसाचा पाकिस्तानला फायदा झाला, असं इरफान पठानच मत आहे. या मॅचमध्ये पावसाने एकूण तीनवेळा व्यत्यय आणला. दोनवेळा पावसाने व्यत्यय आणला. पण तो कमी वेळासाठी होता. मॅचच्या सुरुवातीला शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरीस रौफने भारताला हादरवून सोडलं. दोघांच्या भेदक गोलंदाजीसमोर टीम इंडियाची टॉप ऑडर कोसळली.

एकवेळ टीम इंडियाचा डाव अडचणीत सापडला होता. 66 धावात 4 फलंदाज तंबूत परतले होते. पाकिस्तानने टीम इंडियाला दबावाखाली आणल होतं. पण इशान किशन आणि हार्दिक पांड्याने डाव सावरला. दोघांनी 138 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियाने सामन्यात कमबॅक केलं. पावसामुळे पहिल्या इनिंगनंतर पुन्हा खेळ सुरु होऊ शकला नाही. बराचवेळ प्रतिक्षा केल्यानंतर अखेर सामना रद्द झाला. भारत-पाकिस्तान दोन्ही टीम्सना एक-एक पॉइंट मिळाला. सामन्यानंतर इरफान पठानने एक्सवरुन बाबर आजमच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. 66 धावांवर 4 विकेट असताना बाबर आजमने सामन्यावर नियंत्रण मिळवण्याची संधी गमावली असं इरफान पठानच मत आहे.

उलट पाकिस्तानपेक्षा टीम इंडिया जास्त निराश असेल

ज्या खेळपट्टीवर चेंडूला चांगला बाऊन्स मिळत होता, तिथे 21 ओव्हर्स फिरकी गोलंदाजांना देण्यात काय पॉइंट आहे? हा मुद्दा इरफानने उपस्थित केला. उलट त्याचवेळी तिथे रोहित असता, तर त्याने चार वेगवान गोलंदाजांचा वापर केला असता, असं इरफान पठानने म्हटलय.

“स्पिनर्सनी 21 ओव्हर्समध्ये 133 धावा देऊन एकही विकेट काढला नाही. तेच गेम चेंजर ठरलं. त्याच ठिकाणी भारताची बॉलिंग असती आणि पाकिस्तानच्या 4 बाद 66 धावा असत्या तर टीम इंडियाने वेगवान गोलंदाजी कायम ठेवली असती. कारण त्यांच्याकडे 4 फास्ट बॉलर्सचा पर्याय आहे. तेच पाकिस्तानची टीम 3 वेगवान गोलंदाजांना घेऊन खेळत होती. बाऊन्स असलेल्या खेळपट्टीवर टीम इंडियाने चांगली धावसंख्या उभारली होती. त्यामुळे पाकिस्तानपेक्षा टीम इंडिया जास्त निराश असेल” असं इरफान पठानने एक्सवर म्हटलय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.