IND vs PAK | भारत विरुद्ध पाकिस्तान फायनलमध्ये महाराष्ट्राच्या मुलाकडून चूक, टीमला मोठा फटका, VIDEO

IND vs PAK | 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये जसप्रीत बुमराहने केलेली चूक आठवली. फायनलमध्ये पाकिस्तानी ओपनर सईम अयुबला नशिबाची साथ मिळाली. पाकिस्तान विरुद्ध ओव्हलवर 2017 साली चॅम्पियन ट्रॉफीची फायनल झाली होती.

IND vs PAK | भारत विरुद्ध पाकिस्तान फायनलमध्ये महाराष्ट्राच्या मुलाकडून चूक, टीमला मोठा फटका, VIDEO
IND vs PAK Emerging Asia Cup final Rajvardhan Hangargekar no ball Image Credit source: Fancode
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 8:51 AM

कोलंबो : ACC एमर्जिंग आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानने मोठा विजय मिळवला आहे. फायनलध्ये पाकिस्तान A टीमने भारत A टीमवर तब्बल 128 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 353 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्कारली. टीम इंडियाचा डाव 40 ओव्हरमध्ये 224 धावांवर आटोपला. या मॅचमध्ये भारत A च्या बॉलरकडून झालेली चूक टीमला चांगलीच महाग पडली.

फायनलमध्ये पाकिस्तानी ओपनर सईम अयुबला नशिबाची साथ मिळाली. श्रीलंकेत कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर फायनल मॅच झाली.

महाराष्ट्राच्या बॉलरकडून चूक

भारत A कडून महाराष्ट्राचा वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकरने ही चूक केली. या चुकीने 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमधील नो-बॉलची आठवण करुन दिली. हंगरगेकरच्या बॉलिंगवर अयुबने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण विकेटकीपर ध्रुव ज्युरेलने त्याची कॅच पकडली. हंगरगेकरने ओव्हर स्टेपिंग केल्याने अंपायरने नो-बॉल दिला.

चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये काय चूक झालेली ?

पाकिस्तान विरुद्ध ओव्हलवर 2017 साली चॅम्पियन ट्रॉफीची फायनल झाली होती. त्यावेळी जसप्रीत बुमराहकडून अशीच चूक झाली होती. राजवर्धन हंगरगेकरकडून चूक झाल्यानंतर चाहत्यांना लगेच तो क्षण आठवला. पाकिस्तानचा ओपनर फखर झमन चौथ्या ओव्हरमध्ये आऊट झाला होता. पण त्याला जीवनदान मिळालेलं. टीम इंडियाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागली होती. त्याने थेट शतक ठोकलं होतं.

त्याने असा उचलला फायदा

ACC एमर्जिंग आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 50 ओव्हर्समध्ये 352/8 धावा केल्या. यावेळी हंगरगेकर त्या ठिकाणी होता. पुन्हा एकदा चौथ्याच ओव्हरमध्ये नो-बॉल पडला. सईम अयुबने त्याचा फायदा उचलला. त्याने थेट अर्धशतक ठोकलं व ओपनर फरहान सोबत शतकी भागीदारी केली.

पाकिस्तानी ओपनर्सनी मिळून 121 धावांची मजबूत भागीदारी केली. 18 व्या ओव्हरमध्ये ही जोडी फुटली. त्यांनी टीमला मजबूत सुरुवात दिली. त्यानंतर तय्युब ताहीरने 71 चेंडूत 108 धावा फटकावल्या. त्याच्या बळावर पाकिस्तान A ने 352 धावांचा डोंगर उभारला.

सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.