IND vs PAK Asia Cup 2022: फक्त चार चॅलेंजेस पार करा, टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्ध विजय पक्का
IND vs PAK Asia Cup 2022: बऱ्याच दिवसांपासून क्रिकेट चाहत्यांना भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याची प्रतिक्षा होती. आज क्रिकेट रसिकांची ही इच्छा पूर्ण होणार आहे.
मुंबई: बऱ्याच दिवसांपासून क्रिकेट चाहत्यांना भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याची प्रतिक्षा होती. आज क्रिकेट रसिकांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. 10 महिन्यानंतर दुबई (Dubai) इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये भारत-पाकिस्तानचे संघ आमने-सामने येणार आहे. दहा महिन्यापूर्वी याच मैदानात टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) मध्ये भारत-पाकिस्तानच्या टीम मध्ये लढत झाली होती. त्यावेळी पाकिस्तानने भारतावर एकतर्फी विजय मिळवला होता. आज त्या पराभवाचा हिशोब चुकता करण्याची टीम इंडियाला संधी आहे. आज आशिया कप 2022 च्या निमित्ताने आशियातील हे दोन बलाढ्य संघ आमने-सामने येत आहेत. मागच्यावेळी या दोन संघांमध्ये ज्या फॉर्मेट मध्ये, ज्या मैदानात सामना झाला होता, तिथेच पुन्हा एकदा क्रिकेटचा महासंग्राम होणार आहे. मागच्या चुकांमधून बोध घेत टीम इंडिया समोर आज चार मोठी आव्हान आहेत. ती पार केल्यास, टीम इंडियाचा विजय निश्चित आहे.
- टॉस जिंकणं आवश्यक – मागच्यावेळी नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला होता. भारतीय संघ टॉस हरला होता. यावेळी रोहित शर्माला नशीब साथ देईल आणि टीम इंडिया टॉस जिंकेल, अशी अपेक्षा आहे. यूएई मध्ये होणाऱ्या सामन्यात टॉस महत्त्वाची भूमिका बजावतो, हे अनेकदा दिसून आलय. बुहतांश वेळा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करणारा संघ जास्त सामने जिंकला आहे.
- पावरप्ले मध्ये विकेट वाचवणं आवश्यक – भारताला आतापर्यंत मोठ्या टुर्नामेंट मध्ये महत्त्वाच्या सामन्यात सुरुवातीला विकेट गमावल्यामुळे नुकसान सोसाव लागलं आहे. मागच्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान विरुद्ध पावरप्ले मध्ये 3 विकेट गेल्या होत्या. यावेळी पाकिस्तानकडे शाहीन शाह आफ्रिदी नाहीय. पण अजूनही त्यांची वेगवान गोलंदाजी मजबूत आहे. भारतीय ओपनर्सना त्यांचे गोलंदाज त्रास देऊ शकतात. भारताने पावरप्ले मध्ये विकेट राखून ठेवल्या, तर त्यांना त्याचा पुढे फायदा होईल.
- सुरुवातीला विकेट घ्याव्या लागतील – मागच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने सुरुवातीला विकेट गमावल्या. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांना पाकिस्तानचा एकही विकेट काढता आला नव्हता. बाबर आजम आणि मोहम्मद रिजवान ही सलामीवीरांची जोडी फोडणं इतकं सोपं नाहीय. ही जोडी फोडल्यास, भारताचा विजयाचा मार्ग सुकर बनू शकतो. भुवनेश्वर कुमारसह अन्य गोलंदाजांना पावरप्लेचा योग्य वापर करुन घ्यावा लागेल.
- विराट-राहुलची बॅट तळपली पाहिजे – केएल राहुल आणि विराट कोहली टीम इंडियात पुनरागमन करतायत. दोन्ही खेळाडू ब्रेक नंतर संघात परतले आहेत. राहुलला अजून पूर्ण सूर गवसलेला नाही. झिम्बाब्वे दौऱ्यात ते दिसून आलं. विराट आधीपासूनच खराब फॉर्म मध्ये आहे. चांगली धावसंख्या उभारण्यासाठी या दोन्ही फलंदाजांची बॅट तळपली पाहिजे. अन्यथा भारताचा डाव अडचणीत येऊ शकतो. फक्त धावा करुन भागणार नाही, तर टी 20 फॉर्मेटनुसार, वेगाने धावा जमवाव्या लागतील.