IND vs PAK: शाहीद आफ्रिदीचा पाकिस्तानी टीमवर भरवसा नाय, कोण जिंकणार विचारलं, त्यावर दिलं असं उत्तर

IND vs PAK: शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) आक्रमक क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जायचा. फटकेबाजी करुन वेगाने धावा जमवण्यात तो माहीर होता. तो क्रिकेटच्या (Cricket) पीचवरुन निवृत्त झालाय.

IND vs PAK: शाहीद आफ्रिदीचा पाकिस्तानी टीमवर भरवसा नाय, कोण जिंकणार विचारलं, त्यावर दिलं असं उत्तर
Shahid Afridi Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 2:50 PM

मुंबई: शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) आक्रमक क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जायचा. फटकेबाजी करुन वेगाने धावा जमवण्यात तो माहीर होता. तो क्रिकेटच्या (Cricket) पीचवरुन निवृत्त झालाय. पण आता त्याच्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतो. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात शाहीद आफ्रिदीच्या विधानाची दखल घेतली जाते. पुन्हा एकदा आफ्रिदी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. हे विधान त्याने कुठल्या टीव्ही कॅमेऱ्यासमोर नाही, तर सोशल मीडियावर केलय. आशिया कप (Asia cup) मध्ये 28 ऑगस्टला भारत-पाकिस्तान मध्ये सामना होणार आहे. हा सामना कोण जिंकणार? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर आफ्रिदीने दिलेल्या उत्तराने सर्वचजण हैराण झाले आहेत.

थेट उत्तर देणं टाळलं

टि्वटरवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना, भारत-पाकिस्तान सामन्यावर आपलं मत व्यक्त केलं. एका चाहत्याने त्यांना भारत-पाकिस्तान सामन्याच्या निकालाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर त्याने थेट उत्तर देणं टाळलं. शाहीद आफ्रिदीला थेट प्रश्न विचारण्यात आला. भारत-पाकिस्तान मध्ये मजबूत कोण आहे? कोण जिंकू शकतं? त्यावर आफ्रिदीने भारत किंवा पाकिस्तान कोणाचही नाव घेतलं नाही. जो संघ कमी चूका करेल, तो मॅच जिंकेल, एवढच म्हणाला.

आफ्रिदीच्या मनात पराभवाची भीती?

शाहीद आफ्रिदीचं हे उत्तर ऐकून पाकिस्तान चाहते अवाक झाले. कारण कोणी त्याच्याकडून अशा उत्तराची अपेक्षा केली नव्हती. तो एका संघाच नाव घेईल, असं अनेकांना वाटत होतं. कदाचित तो पाकिस्तानच नाव घेईल, असं वाटलं. पण आफ्रिदीच्या या उत्तरानंतर त्याचा पाकिस्तानी टीम वर पूर्ण विश्वास नाहीय हे स्पष्ट झालय. पाकिस्तान हरु शकतो, ही भीती सुद्धा त्याच्या मनात असावी. म्हणून त्याने या प्रश्नावर थेट उत्तर देणं टाळलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.