IND vs PAK, T20 World Cup 2021: कशी असेल पाकिस्तानविरुद्ध भारताची प्लेइंग XI? विराट कोहली म्हणाला एक संतुलित संघ…

विराट कोहलीने पाकिस्तानविरोधात भारत कोणत्या प्लेईंग इलेव्हनसोबत उतरणार हे जरी सांगितलं नसलं तरी तो या प्रश्नावर म्हणाला की, आम्ही एका संतुलिस संघासह मैदानात उतरू.

IND vs PAK, T20 World Cup 2021: कशी असेल पाकिस्तानविरुद्ध भारताची प्लेइंग XI? विराट कोहली म्हणाला एक संतुलित संघ...
Team India
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 12:46 PM

मुंबई : भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत आजपासून (24 ऑक्टोबर) आपली मोहिम सुरु करणार आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघ आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये वातावरणनिर्मिती सुरु आहे. दोन्ही देशांचे अनेक माजी खेळाडू आणि क्रीडा समीक्षक या सामन्याबद्दल आपापली मतं व्यक्त करत आहेत. अनेकांनी या सामन्यात भारताने कोणत्या प्लेईंग इलेव्हनसोबत उतरावं याबाबतचे सल्ले दिले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया कशी असेल? टीम कॉम्बिनेशन कसं असेल? कॅप्टन कोहली कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत मैदानात उतरेल? हार्दिक पांड्या खेळणार की नाही? अशा अनेक प्रश्नांवर सध्या क्रिकेटविश्वात चर्चा सुरु आहेत. दरम्यान, यापैकी काही प्रश्नांची उत्तरं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिली आहेत. (IND vs PAK, T20 World Cup 2021: Virat Kohli Says we have balanced Team, Playing XI against Pakistan)

विराट म्हणाला की, आम्ही गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या निमित्ताने टी-20 क्रिकेट खेळत आहोत. आम्ही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी तयार आहोत. टीममधील सर्व खेळाडूंना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळे आम्ही पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये चांगला खेळ करु. विराटला यावेळी त्याच्या कर्णधारपदावरुन काही प्रश्न विचारण्यात आले, यावर तो म्हणाला की, कर्णधारपदाबद्दल मी यापूर्वी अनेकदा बोललो आहे.

हार्दिक पंड्या पूर्णपणे फिट

दरम्यान, विराटने हार्दिक पांड्याविषयीच्या अनेक प्रश्नांवर उत्तरं दिली. तो म्हणाला की, पंड्याची प्रकृती सध्या चांगली असून तो मॅचमध्ये दोन षटकं गोलंदाजी करु शकतो, अशी त्याची स्थिती आहे. हार्दिक पंड्या त्याच्या पूर्ण क्षमतेनं खेळतो त्यावेळी त्यानं सर्वोतकृष्ट खेळ केलेला आहे. तो फिट असल्याचे विराटनं सांगितले. तसेच पाकिस्तानविरुद्धच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा आज होणार नसल्याचे विराट कोहलीने सांगितले आहे.

कशी असेल भारताती प्लेईंग XI?

सलामीवीर : संघात सलामीची जबाबदारी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यावर असेल.

मधली फळी : तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि त्यानंतर अनुक्रमे सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांची नावे समाविष्ट केली जातील.

खालची फळी (अष्टपैलू-गोलंदाज) : रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार

इतर बातम्या

India vs Pakistan: मला यावेळी पाकिस्तानचं पारडं अधिक जड वाटतंय, ‘या’ नेत्याकडून टीम इंडियाला सावधगिरीचा इशारा

T20 World Cup 2021 Ind vs Pak : वसीम जाफरनं वात पेटवली, पाकिस्तानच्या वर्मावर बोट, भन्नाट मीम्सद्वारे डिवचलं

India vs Pakistan, T20 World Cup LIVE Streaming : जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत- पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना

(IND vs PAK, T20 World Cup 2021: Virat Kohli Says we have balanced Team, Playing XI against Pakistan)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.