T20 World Cup 2022: पाकिस्तान विरुद्ध अश्विन आणि चहलमध्ये कोणाला संधी मिळणार? ‘हे’ आहे उत्तर

T20 World Cup 2022: रोहित शर्मा, टीम मॅनेजमेंटसमोर दोन्ही पर्याय खुले आहेत, पण....

T20 World Cup 2022: पाकिस्तान विरुद्ध अश्विन आणि चहलमध्ये कोणाला संधी मिळणार? 'हे' आहे उत्तर
Ashwin-chahalImage Credit source: AP
Follow us
| Updated on: Oct 16, 2022 | 12:05 PM

T20 World Cup 2022 बिगुल वाजलं आहे. पहिल्या राऊंडचे सामने सुरु आहेत. भारताच्या अजून दोन वॉर्म अप मॅचेस बाकी आहेत. त्यानंतर मुख्य अभियान सुरु होईल. भारताचा पहिलाच सामना पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) आहे. 23 ऑक्टोबरला मेलबर्नच्या मैदानात दोन्ही टीम्स आमने-सामने येतील. त्याआधी एक प्रश्न आहे. या मॅचमध्ये रोहित रविचंद्रन अश्विन की, युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) दोघांपैकी कोणाला संधी देणार?

पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाची प्लेइंग 11 कशी असेल? एक-दोन प्लेयर सोडल्यास चित्र स्पष्ट आहे. एक-दोन बदलांमध्ये चहल आणि अश्विनच स्थान आहे. या दोघांपैकी कोणी एक खेळू शकतो.

चहलला अश्विनकडून आव्हान

युजवेंद्र चहलला टीम मॅनेजमेंटची पहिली पसंती होती. पण अश्विनने त्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला आहे. त्यामुळे अश्विनकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अश्विनने दुसऱ्या प्रॅक्टिस मॅचमध्ये दमदार कामगिरी केली. टीम इंडियात हरली पण अश्विनने मन जिंकून घेतलं.

फक्त प्रॅक्टिस मॅचच्या आधारावर….

फक्त प्रॅक्टिस मॅचच्या आधारावर युजवेंद्र चहलपेक्षा अश्विनचा दावा मजबूत आहे, असं म्हणण योग्य होणार नाही. यासाठी दोघांची या वर्षातली कामगिरी लक्षात घेणंही आवश्यक आहे. T20I मध्ये फलंदाजांसाठी जसा स्ट्राइक रेट महत्त्वाचा असतो, तसं गोलंदाजांसाठी त्यांनी टाकलेले डॉट बॉल महत्त्वाचे असतात.

वर्ष 2022 मध्ये चहल VS अश्विन

चहल आणि अश्विनने यावर्षी T20I मध्ये केलेल्या प्रदर्शनावर नजर टाकूया. चहलने 18 डावात 21 विकेट घेतल्यात. त्याची इकॉनमी 7.60 आहे. डॉट बॉलची टक्केवारी 34.93 आहे.

अश्विनने यावर्षी T20I च्या 8 डावात 5 विकेट घेतल्या आहेत. अश्विनच्या गोलंदाजीची इकोनमी 6.84 आहे. त्याच्या डॉट बॉलच पर्सेन्टेज 42.19 आहे.

दोघांचे आपले फायदे, निर्णय टीम इंडियाचा

विकेट काढण्याच्या हिशोबाने टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध युजवेंद्र चहलला संधी देऊ शकते. पण निर्धाव चेंडूचा विचार केल्यास अश्विनला संधी मिळू शकते. चहल लेग स्पिनर आहे आणि अश्विन ऑफ स्पिनर आहे. अलीकडचा रेकॉर्ड पाहिला तर, पाकिस्तानी फलंदाज लेग स्पिनच्या तुलनेत ऑफ स्पिन गोलंदाजी खेळताना जास्त अडचणीत आले आहेत.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...