Sunil Gavaskar: टीम इंडिया जिंकल्यानंतर गावस्कर मैदानात एकदम ‘कडक’ नाचले, पहा VIDEO

Sunil Gavaskar: गावस्करांना आपल्या भावना रोखता आल्या नाहीत, एका लहान मुलासारखा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता.

Sunil Gavaskar: टीम इंडिया जिंकल्यानंतर गावस्कर मैदानात एकदम 'कडक' नाचले, पहा VIDEO
Sunil Gavaskar
Follow us
| Updated on: Oct 24, 2022 | 8:31 AM

मेलबर्न: मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) रविवारी टीम इंडियाने पाकिस्तानवर (IND vs PAK) रोमांचक विजय मिळवला. पुढची अनेक वर्ष हा विजय क्रिकेटप्रेमींच्या लक्षात राहील. शेवटच्या चेंडूवर अश्विनने (Ashwin) चौकार मारुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर दिग्गज खेळाडू, फॅन्स, अबाल वुद्ध कोणीही आपल्यावर नियंत्रण ठेवू शकले नाहीत.

संपूर्ण स्टेडियमवर इंडिया-इंडिया

प्रत्येकाने जो जिथे होता, तिथे त्याने आपल्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं. सेलिब्रेशनचे हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, यात सुनील गावस्करांचा डान्स सुद्धा आहे.

भारताला शेवटच्या चेंडूवर एक रन्सची गरज होती. अश्विन स्ट्राइकवर होता. त्याने विजयी धाव घेताच मेलबर्न स्टेडियमवर उपस्थित 90 हजार प्रेक्षकांनी एकच जल्लोष सुरु केला. संपूर्ण स्टेडियमवर इंडिया-इंडियाच्या घोषणा ऐकू येत होत्या. विजयाच्या या आनंदात कॉमेंटेटर सुनील गावस्करही नाचताना दिसले. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

आनंदात गावस्करांचा डान्स

सामन्यात शेवटच षटक सुरु होतं. त्यावेळी कॉमेंट्री करणारे इरफान पठान, एस श्रीकांत आणि सुनील गावस्कर बाऊंड्री लाइनवर उभे होते. भारताने विजयी धाव घेताच सुनील गावस्करांनी नाचायला सुरुवात केली. टाळ्या वाजवून ते आनंदात उड्या मारत होते. इरफान पठानही गावस्करांचा हा अवतार पाहून थक्क झाला. “एमसीजीमध्ये शानदार दृश्य पहायला मिळालं. सनी पाजी नाचण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. विराट कोहली खरच तू किंग आहेस, इंडिया-इंडिया” असं कॅप्शन इरफान पठानने या व्हिडिओला दिलय.

सेलिब्रेशनचे व्हिडिओ व्हायरल

मेलबर्नच नाही, देशाच्या वेगवेगळ्या भागात या विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. जम्मू असो वा मेलबर्न प्रत्येक ठिकाणी फॅन्स सेलिब्रेशन करताना दिसले. या विजयासह टीम इंडियाने मागच्या टी 20 वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेतला.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.