IND vs SA: टीम इंडियाला हरवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने 14 वर्षाच्या भारतीय क्रिकेटपटूची घेतली मदत
राजधानी दिल्लीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेत टी 20 सीरीजची (T 20 Series) सुरुवात होणार आहे. 9 जूनला अरुण जेटली स्टेडियममध्ये पहिला टी 20 सामना खेळला जाणार आहे.
मुंबई: राजधानी दिल्लीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेत टी 20 सीरीजची (T 20 Series) सुरुवात होणार आहे. 9 जूनला अरुण जेटली स्टेडियममध्ये पहिला टी 20 सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघ त्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. सीनियर खेळाडूशिवाय उतणाऱ्या भारतीय संघाला हरवण्याचा दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) उद्देश आहे. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यांना जे-जे शक्य आहे, ते सर्व करत आहे. दक्षिण आफ्रिकेने आता एका 14 वर्षीय भारतीय क्रिकेटपटूची मदत घ्यायचं ठरवलं आहे. रौनक वाघेला (Raunak Waghela) असं या क्रिकेटपटूच नाव आहे. दिल्ली क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या स्तरावर त्याने आपल्या कामगिरीची छाप उमटवली आहे. रौनकला नेट बॉलर म्हणून दक्षिण आफ्रिकेने आपल्या संघासोबत जोडलं आहे. आता प्रश्न हा आहे की, 14 वर्षाच्या रौनककडून दक्षिण आफ्रिकेच्या संघाला काय मदत मिळेल? टीम इंडियाला हरवण्यासाठी रौनक दक्षिण आफ्रिकेच्या टीमला कशी मदत करु शकतो?
दक्षिण आफ्रिकेच्या मनात कुलचाची भिती
दिल्लीच्या ईगल क्रिकेट क्लबकडून खेळणारा रौनक वाघेला डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. रौनक वाघेलाची मदत घेण्यामागच हेच कारण आहे. कुलदीप यादव डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेंबा बावुमाने कुलदीपपासूनच सर्वात जास्त धोका असल्याचं म्हटलं होतं. डावखुरी फिरकी गोलंदाजी खेळणं दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना नेहमीच जड जात.
कुलदीपचाच सामना करायचाय
सीरीजमध्ये त्यांना प्रत्यक्षात कुलदीपचाच सामना करायचा आहे. त्यामुळे त्यांनी रौनक वाघेलाला नेट बॉलिंगसाठी पाचारण केलं आहे. रौनक सुद्धा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेला कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांची सर्वात जास्त धास्ती आहे. ते ‘कुलचा’ जोडीला खूप घाबरतात.
रौनक काय म्हणाला?
रौनक वाघेलाच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज सराव करतील, तेव्हा त्यांना कुलदीपची गोलंदाजी खेळताना मदत होईल. रौनक वाघेलाची दक्षिण आफ्रिकेने निवड केलीय, त्यावर तो म्हणाला की, “वर्ल्डच्या टॉप क्लास फलंदाजांना गोलंदाजी करणं, माझ्यासाठी चांगली बाब आहे. हा अनुभव दीर्घकाळ माझ्यासोबत राहील”