पार्ल: रासी वान डेर डुसे (Rassie van der Dussen) आणि कॅप्टन टेंबा बावुमा (Temba Bavuma) यांनी आज भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी लागोपाठ शतक झळकावून भारतीय गोलंदाजी निष्प्रभ केली. बावुमाने 143 चेंडूत 110 धावांची खेळी केली, तर डुसे 96 चेंडूत 129 धावांवर नाबाद होता. डुसेने 83 चेंडूत शतक झळकावलं. या दोघांच्या फलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी 297 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
बोलँड पार्कची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असल्याने नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. डुसेने त्याच्या शतकी खेळीत दोन षटकार आणि आठ चौकार लगावले. 18 व्या षटकात दक्षिण आफ्रिकेची 68/3 अशी स्थिती असताना डुसे फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने धावफलक हलता ठेवला.
चौथ्या विकेटसाठी बावुमा-डुसे जोडीने 204 धावांची भागीदारी केली. शतकानंतर डुसेने अधिक आक्रमक फलंदाजी केली व संघाची धावसंख्या 296 पर्यंत पोहोचवली. युजवेंद्र चहलने त्याचा दहा षटकांचा कोटा पूर्ण करताना 53 धावा दिल्या. पण त्याला एकही विकेट मिळाला नाही. बुमराह, शार्दुल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमार या वेगवान गोलंदाजांना बावुमा-डुसे जोडीने दाद दिली नाही.
RAMPAGING RASSIE?
Rassie van der Dussen follows his captain’s lead and rockets to a half-century off 83 balls? #SAvIND #BetwayODISeries #BePartOfIt | @Betway_India pic.twitter.com/HR8PJRcumh
— Cricket South Africa (@OfficialCSA) January 19, 2022
बोलँड पार्क पीच रिपोर्ट
पार्लमधील बोलँड पार्कची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. त्यामुळे या सामन्यात चांगली धावसंख्या पाहायला मिळू शकते. वेगवान आऊटफिल्ड आणि सीमारेषा छोटी असल्यामुळे मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. कसोटीमधील खेळपट्टया गोलंदाजांना मदत करणाऱ्या होत्या. याउलट वनडेमध्ये पीच फलंदाजीला अनुकूल आहे. वेगवान गोलंदाजांना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, तर ते फलंदाजांना अडचणीत आणू शकतात.
IND vs SA, 1st ODI Rassie van der Dussen Temba Bavuma hit centurys