IND vs SA 1st T 20: भारताचं वर्ल्ड रेकॉर्डच स्वप्न भंगल, दक्षिण आफ्रिकेने दिल्ली जिंकली, Highlights VIDEO
IND vs SA 1st T 20: भारताने दक्षिण आफ्रिकेला (IND vs SA) विजयासाठी 212 धावांचं विशाल लक्ष्य दिलं होतं. पण दक्षिण आफ्रिकेने आरामात हे टार्गेट पार केलं.
मुंबई: भारताने दक्षिण आफ्रिकेला (IND vs SA) विजयासाठी 212 धावांचं विशाल लक्ष्य दिलं होतं. पण दक्षिण आफ्रिकेने आरामात हे टार्गेट पार केलं. डेविड मिलर (David Miller) आणि रासी वॅन डर डुसे (Rassie van der Dussen) दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचे नायक ठरले. दोघांनी भारताच्या एकाही गोलंदाजाला दाद दिली नाही. अत्यंत सहजपणे त्यांनी भारताची गोलंदाजी फोडून काढली. आधी डेविड मिलरने किलर अंदाज दाखवला. त्यानंतर डुसे भारतीय बॉलर्सवर तुटून पडला. आवेश खानच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने मिडविकेटला डुसेचा झेल सोडला. तो भारताला खूपच महाग पडला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 131 धावांची भागीदारी केली. डुसे-मिलर जोडीने मैदानावर फोर, सिक्सचा पाऊस पडला. दोघांना कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करायची हा भारतीय गोलंदाजांना प्रश्न पडला होता. मिलरने 31 चेंडूत नाबाद 64 धावा फटकावल्या. यात 4 फोर आणि 5 सिक्स आहेत. डुसे 46 चेंडूत नाबाद 75 धावा तडकावल्या. यात 7 चौकार आणि 5 षटकार आहेत.
इथे क्लिक करुन पहा सामन्यातील खास HighLights Videos
दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नव्हती
अत्यंत सहजतेने ते चेंडू सीमारेषेपार पाठवत होते. त्यातल्या त्यात आवशे खानने थोडी चांगली गोलंदाजी केली. त्याने चार ओव्हर्समध्ये 35 धावा दिल्या. अन्य सर्व गोलंदाज महागडे ठरले. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नव्हती. कॅप्टन टेंबा बावुमा संघाची धावसंख्या 22 असताना आऊट झाला. त्याने भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक पंतकडे झेल दिला. बावुमाने 10 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ड्वेन प्रिटोरियसने आपलं काम चोख बजावलं. त्याने 13 चेंडूत 29 धावा फटकावल्या. यात एक चौकार आणि चार षटकार होते. त्याला हर्षल पटेलने बोल्ड केलं. मिलर आणि डुसेमुळे भारताचं वर्ल्ड रेकॉर्डच स्वप्न भंगलं. भारताने आज टी 20 क्रिकेटमध्ये सलग 13 वा सामना जिंकला असता, तर तो वर्ल्ड रेकॉर्ड ठरला असता. पण दोघांनी भारतीय गोलंदाजांची पार वाट लावून टाकली. पाच सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
1ST T20I. South Africa Won by 7 Wicket(s) https://t.co/lJK64Ef1FI #INDvSA @Paytm
— BCCI (@BCCI) June 9, 2022
इशान किशनची खेळी वाया
तत्पूर्वी भारताकडून इशान किशनने आज जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 48 चेंडूत 76 धावा चोपल्या. यात 11 चौकार आणि 3 षटकार होते. हार्दिक पंड्याने व्हाइस कॅप्टन म्हणून छाप उमटवली. त्याने 12 चेंडूत 31 धावा फटकावल्या. आयपीएलमधला फॉर्म त्याने इथेही कायम ठेवला. त्याने 2 चौकार आणि 3 षटकार ठोकले. भारताकडून श्रेयस अय्यर आणि कॅप्टन ऋषभ पंतनेही उपयुक्त फलंदाजी केली. दोघांनी अनुक्रमे (36) आणि (29) धावा केल्या. त्यामुळेच भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी विशाल लक्ष्य ठेवता आलं.