IND vs SA 1st T20: पीच पाहून केएल राहुल टेंशनमध्ये होता, त्यावेळी Suryakumar Yadav त्याला एवढच म्हणाला…
IND vs SA 1st T20: सूर्यकुमार पीचवर येताच मॅचचा नूर पालटला. तो केएल राहुलला काय म्हणाला?
मुंबई: टीम इंडियाने बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला T20 सामना जिंकला. या पीचवर बॅटिंग करणं खूपच कठीण होतं. केएल राहुल इतकं हे चांगलं कोणाला समजू शकत नाही. तिरुवनंतपुरमची ही खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल होती. केएल राहुल इथे बॅटिंग करताना एकवेळ टेंशनमध्ये होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली झटपट बाद झाल्यानंतर राहुलचं हे टेन्शन आणखी वाढलं होतं.
स्कोर बोर्डवर धावा दिसत नव्हत्या
त्यावेळी सूर्यकुमार यादवच्या रुपाने राहुलचा ताण हलका झाला. सूर्यकुमार यादवने खेळपट्टीवर पाय ठेवताच सामन्याचा नूर पालटला. केएल राहुल आधी धीम्यागतीने फलंदाजी करत होता. सूर्या क्रीजवर नव्हता. त्यावेळी सीनियर फलंदाज म्हणून केएल राहुलवर दबाव होता. स्कोर बोर्डवर धावा दिसत नव्हत्या. सूर्या क्रीजवर येताच सामन्याच समीकरण बदललं.
सूर्याने राहुलला काय सांगितलं?
आता प्रश्न हा आहे की, असं काय झालं? केएल राहुलने त्या बद्दल सामन्यानंतर सांगितलं. “सूर्या विकेटवर येताच त्याने पहिल्या चेंडूपासून नैसर्गिक खेळ सुरु केला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला करण्याची रणनिती त्याने अंगिकारली. तू तुझा फलंदाजीसाठी पूर्ण वेळ घे, असं त्याने मला सांगितलं?”
सूर्याने दूर केलं टेन्शन
पीचवर अडचण येत असेल, तर तू तुझा पूर्ण वेळ घे. स्कोर बोर्डच टेन्शन घेऊ नको, असं सहकारी फलंदाज सांगत असेल, तर यापेक्षा अजून काय हवं. केएल राहुलसोबत सुद्धा हेच झालं. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. कठीण खेळपट्टीवर धीम्यागतीने फलंदाजी सुरु होती. त्यामुळे डोक्यावर असलेलं टेन्शन निघून गेलं.
राहुलच्या अर्धशतकी खेळीत किती षटकार?
केएल राहुलने धीमी सुरुवात केली होती. पण नंतर त्याने वेग पकडला. सूर्यकुमार यादव आक्रमक फलंदाजी करत होता. ते पाहून राहुलने सुद्धा आपल्या फलंदाजीचा गियर बदलला. त्यामुळेच राहुलने धीम्या सुरुवातीनंतरही 56 चेंडूत नाबाद 51 धावा फटकावल्या. यात 4 षटकार आहेत. केएल राहुलने याच पीचवर षटकार ठोकून भारताचा विजय सुनिश्चित केला.