IND vs SA: उपकर्णधार झाल्यामुळे तुझे केस पांढरे झाले की काय? मयंकच्या प्रश्नावर राहुलचं हटके उत्तर

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. 26 डिसेंबरपासून जोहान्सबर्ग येथून उभय संघांमधील कसोटी मालिका सुरू होणार आहे. टीम इंडियाला अद्याप दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.

IND vs SA: उपकर्णधार झाल्यामुळे तुझे केस पांढरे झाले की काय? मयंकच्या प्रश्नावर राहुलचं हटके उत्तर
KL Rahul - Mayank Agarwal
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 1:02 PM

मुंबई : भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. 26 डिसेंबरपासून जोहान्सबर्ग येथून उभय संघांमधील कसोटी मालिका सुरू होणार आहे. टीम इंडियाला अद्याप दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. मात्र नुकत्याच झालेल्या परदेश दौऱ्यांमध्ये संघाने चांगला खेळ दाखवला आहे. अशा स्थितीत भारताकडून शानदार खेळाची अपेक्षा आहे आणि भारत दक्षिण आफ्रिकेतील पहिली कसोटी मालिका जिंकेल, असा विश्वासही क्रिकेटरसिकांना आहे. या दौऱ्यावर भारताच्या डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांच्यावर असेल. या दोघांनी मालिका सुरू होण्यापूर्वी एकमेकांशी संवाद साधत या मालिकेबद्दलच्या अपेक्षा आणि तयारीबद्दल चर्चा केली. तसेच एकमेकांच्या आतापर्यंतच्या क्रिकेट प्रवासावर चर्चा केली. (IND vs SA 2021, KL Rahul and Mayank Agarwal interview before south africa test, BCCI shared video)

बीसीसीआयने मयंक आणि राहुलच्या संभाषणाचा व्हिडिओ आपल्या वेबसाइटवर पोस्ट केला आहे. यामध्ये दोघांनी अनेक मुद्द्यांवर गप्पा मारल्या. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या कसोटी मालिकेसाठी मयंकने राहुलला उपकर्णधारपद मिळण्याबाबत विचारले. राहुलने उत्तर दिले की, 6-7 महिन्यांपूर्वी पुन्हा कसोटी क्रिकेट कसं खेळणार हे देखील माहित नव्हते. पण गोष्टी झपाट्याने बदलल्या आहेत. उपकर्णधारपद मिळाल्याने आनंद झाला आणि सन्मान वाटतो. मी संघासाठी 100 टक्के देईन, जसे पूर्वी देत ​​आलो आहे. मयंकने पुढे मजेशीरपणे विचारले की, टीम इंडियात जबारदारी मिळाली की, केसही पांढरे होतात, हे खरं आहे का? यावर राहुल म्हणाला,

“हो माझे केस पांढरे झालेत, आयपीएलमध्ये कर्णधारपद मिळाल्यानंतरही असंच घडलं होतं. टीम इंडियाच्या जबाबदारीमुळे आतापर्यंत असं घडलं नाही, पण तसे झाले तर बरे होईल. प्रत्येकाला टीम इंडियाचे उपकर्णधारपद स्वीकारायचे आहे. त्यामुळे पांढऱ्या केसांची काळजी करू नका”

एकत्र क्रिकेट कारकीर्द सुरु

मयंक आणि राहुल हे दोघेही कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहेत. दोघांची क्रिकेट कारकीर्दही एकाच वेळी सुरू झाली. त्यानंतर 2014 मध्ये केएल राहुलने टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले. तर मयंक अग्रवालला 2018 साली ही संधी मिळाली. विशेष म्हणजे, या दोघांचेही कसोटी पदार्पण ऑस्ट्रेलियात झाले आणि दोघांनीही बॉक्सिंग डे म्हणजेच ख्रिसमसच्या दिवशी कसोटी कारकीर्द सुरु केली.

याबाबत राहुल मयंकला म्हणाला, ‘माझ्याकडे बॉक्सिंग डे कसोटीच्या खमंग आठवणी आहेत. मी बॉक्सिंग डे कसोटीद्वारेच पदार्पण केले, ज्यामध्ये चांगली कामगिरी झाली नाही. त्यानंतर बॉक्सिंग डे टेस्टनंतरच माझी संघातून हकालपट्टी झाली आणि माझ्या जागी तू आलास. मी धावा न केल्यामुळे माझे काय होणार हे मला माहीत होते.

आतापर्यंतचा प्रवास खूप सुंदर झाला. आम्हा दोघांनाही स्वप्नातही वाटले नव्हते की, आम्ही एकत्र टीम इंडियासाठी खेळू. होय, भारतासाठी खेळणे हे एक स्वप्न होते आणि त्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत, परंतु मागे वळून पाहताना, सर्वकाही खूप आश्चर्यकारक आणि जादुई वाटतंय. मला वाटतं आत्ता ही आम्हा दोघांसाठी फक्त सुरुवात आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

इतर बातम्या

आशियाई 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा; सलामीच्या लढतीमध्ये भारताचा विजय; यूएईवर 154 धावांनी मात

Sachin Tendulkar : सिराजच्या पायात स्प्रिंग असल्यासारखं वाटतं, सचिन तेंडुलकरच्या शाबासकीनंतर मोहम्मद सिराज म्हणाला…

IPL 2022: ब्रायन लारा आणि डेल स्टेनने IPL मधील ‘या’ संघाच्या प्रशिक्षकपदाची स्वीकारली जबाबदारी

(IND vs SA 2021, KL Rahul and Mayank Agarwal interview before south africa test, BCCI shared video)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.