IND vs SA, 2nd ODI: ‘…तर राहुल द्रविड यांच्याबद्दल आदर राहणार नाही’, ऋतुराज गायकवाडवरुन नेटकरी भडकले
त्याच्या या निर्णयावर टि्वटरवर अनेकजण व्यक्त झाले आहे. पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराज गायकवाडला संधी न देण्याच्या निर्णयावर अनेकांनी राहुलला झापलं आहे.
मुंबई: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. वेंकटेश अय्यरच्याजागी (Venkatesh iyer) महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. पण कॅप्टन केएल राहुलने (KL Rahul) पहिल्या वनडेतील संघच कायम ठेवला आहे. त्याच्या या निर्णयावर टि्वटरवर अनेकजण व्यक्त झाले आहे. पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराज गायकवाडला संधी न देण्याच्या निर्णयावर अनेकांनी राहुलला झापलं आहे.
टॅलेंट उद्धवस्त करणारी वॉल
टि्वटरवर ऋतुराजची स्थानिक स्पर्धेतील तसेच आयपीएल 2021 मधील कामगिरीचे आकडे पोस्ट केले आहेत. ऋतुराजने आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळवली, ते राहुलने खूप मनावर घेतलं, असं एका युजरने टि्वटमध्ये म्हटलं आहे. ऋतुराजला या मालिकेत एकही संधी मिळाली नाही, तर राहुल द्रविड यांच्याबद्दल मनात कुठलाही आदर शिल्लक राहणार नाही. टॅलेंट उद्धवस्त करणारी वॉल असे एका युझरने म्हटले आहे.
No more respect for Rahul dravid , if ruturaj didn’t get a single chance in this series also . Heard he is a wall , yes agreeing ” Wall for destroying talents ” .
Worst coach ever Mr.Wall ?#INDvsSA #Ruturaj pic.twitter.com/2gmw8qbrGJ
— Nivi_39 (@Nivi39) January 21, 2022
वेंकटेश अय्यरला गोलंदाजी देणार की, नाही, याबद्दल स्पष्टत नाहीय. मागच्या सामन्यात टेंबा बावुमा आणि डुसेची जोडी प्रमुख गोलंदाजांना फोडता आली नाही. त्यावेळी वेंकटेश अय्यरकडे चेंडू सोपवायला हवा होता. पण त्याला गोलंदाजी दिली नाही. त्याबद्दल कॅप्टन राहुलवर बरीच टीका झाली. वेंकटेश अय्यरला बॉलिंग द्यायची नसेल, तर त्याच्याजागी ऋतुराज गायकवाड या स्पेशलिस्ट फलंदाजाला संधी दिली पाहिजे, असं अनेक क्रिकेट पंडितांच मत होतं.
i think When RUTURAJ win orange cap, kl rahul took it personally #Ruturaj pic.twitter.com/YpPmbHQbF2
— Harshal Lahane (@HarshalLahane1) January 19, 2022
Ruturaj gaikwad to himself after not getting chance in playing Xi : pic.twitter.com/kRviT5RgMZ
— Mehul?? (@mahzz04) January 21, 2022
ऋतुराज गायकवाडचा परफॉर्मन्स विजय हजारे वनडे टुर्नामेंटमध्ये पाच सामन्यात ऋतुराज गायकवाडने चार शतक झळकावली आहेत. त्याने 600 पेक्षा अधिक धावा केल्या. त्याशिवाय आयीपएल 2021 मध्ये सुद्धा चौफेर फटकेबाजी करुन खोऱ्याने धावा वसूल केल्या आहेत.