IND vs SA: हजारो प्रेक्षकांनी एकत्र गायलं, ‘मां तुझे सलाम’, पहा अंगावर शहारे आणणारा VIDEO

टीम इंडिया (Team India) ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीज खेळत आहे. आधी दिल्ली आणि नंतर कटक येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

IND vs SA: हजारो प्रेक्षकांनी एकत्र गायलं, 'मां तुझे सलाम', पहा अंगावर शहारे आणणारा VIDEO
IND vs SA Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 12:22 PM

मुंबई: टीम इंडिया (Team India) ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरीज खेळत आहे. आधी दिल्ली आणि नंतर कटक येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ओदिशा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडिया बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही विभागात अपयशी ठरली. भारताचा पराभव झाला असला, तरी दुसऱ्या टी 20 सामन्यातील छाती अभिमानाने फुलून येईल, असा एक सुंदर व्हिडिओ समोर आलाय. भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये टी 20 सामना (IND vs SA) सुरु असताना, हजारो प्रेक्षक ‘मा तुझे सलाम’ हे गाणं गुणगुणत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल झालाय.

सामना सुरु होण्याआधीच हे दृश्य आहे

सामना सुरु होण्याआधीच हे दृश्य आहे, जेव्हा सगळं मैदान भरलं होतं. हजारो प्रेक्षक मैदानावर पोहोचले होते, व त्यांनी आपली मोबाइलची फ्लॅश लाइट ऑन केली होती. असंच दृश्य 2011 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहायला मिळालं होतं.

दक्षिण आफ्रिकेची मालिकेत आघाडी

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 4 विकेटने पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट गमावून 148 धावा केल्या होत्या. धावा कमी होत्या, तरी फलंदाजांनी चांगली सुरुवात करुन दिली होती. पहिल्या 10 षटकात दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 3 बाद 57 होती. भुवनेश्वर कुमारने पावरप्लेमध्ये तीन विकेट काढून चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र तरीही टीम इंडियाचा पराभव झाला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.