IND vs SA : जोहान्सबर्गमधून क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी! दुसऱ्या कसोटीवर पावसाचं सावट

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जाणार आहे. आजपासून हा सामना खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेची स्थिती करा किंवा मरा अशी असणार आहे.

IND vs SA : जोहान्सबर्गमधून क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी! दुसऱ्या कसोटीवर पावसाचं सावट
Johannesburg stadium
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 11:01 AM

जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जाणार आहे. आजपासून हा सामना खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेची स्थिती करा किंवा मरा अशी असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ जोहान्सबर्ग कसोटी जिंकू शकला नाही, येथे त्यांचा पराभव झाला तर त्यांना मालिका देखील गमवावी लागेल. असे झाल्यास भारताविरुद्ध घरच्या मैदानावर हा त्यांचा पहिला कसोटी मालिका पराभव ठरेल. दुसरीकडे, द. आफ्रिकेने हा सामना जिंकल्यास जोहान्सबर्गमध्ये भारताने कसोटी सामन्यात पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ असेल. (Ind vs SA, 2nd Test, Johannesburg weather report : Rain is likely to disrupt today’s game)

भारतीय संघ हा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ टीम इंडियाला असे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून द. आफ्रिकन संघ आपल्या मालिकेतील आशा कायम ठेवू शकेल. आता उद्दिष्ट मोठे असताना कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ महत्त्वाचा ठरतो. पण, हे उद्दिष्ट पूर्ण होण्याआधी जोहान्सबर्गमधून येणाऱ्या बातम्या चांगल्या नाहीत. पहिल्या दिवसाच्या खेळात पाऊस खलनायक ठरण्याची शक्यता आहे.

Weather.com नुसार, कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे सामन्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. दुपारी 50 टक्के पाऊस पडू शकतो. आता असे असेल तर पावसाच्या व्यत्ययामुळे आजच्या दिवसाच्या खेळाची मजा कमी होणार आहे. मात्र, त्याहून चिंतेची बाब म्हणजे कसोटी सामन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या दिवशी जोहान्सबर्गचे हवामान खूपच वाईट असल्याचे दिसते.

सेंच्युरियनमध्ये पावसाचा अडथळा, तरीही भारत विजयी

सेंच्युरियनमध्येही पावसाचा अडथळा निर्माण झाला होता. पण त्याचा परिणाम सामन्याच्या निकालावर दिसला नाही. सेंच्युरियनमधल्या पावसाने कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ होऊ शकला नव्हता. तरीही भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा अभेद्य किल्ला म्हटल्या जाणाऱ्या सेंच्युरियनवर 113 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.

जोहान्सबर्गमध्ये भारताचं पारडं जड

जोहान्सबर्गमध्ये भारताचा हा सहावा कसोटी सामना असेल. भारताने याआधी येथे खेळलेल्या 5 पैकी 2 कसोटी सामने जिंकले आहेत. तर 3 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. जोहान्सबर्गचे आकडे टीम इंडियाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट आहे. तसेच पहिली कसोटी जिंकल्यामुळे टीम इंडिया अधिक आत्मविश्वासाने या सामन्यात खेळेल. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये यजमानांचं पारडं टीम इंडियापेक्षा नेहमीच जड राहिलं आहे. उभय संघांमध्ये आतापर्यंत 21 कसोटी सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताला केवळ 4 कसोटी जिंकता आल्या आहेत. भारताने यापैकी 10 सामने गमावले आहेत. तर 7 सामने अनिर्णित राहिले आहेत.

प्लेईंग इलेव्हनमध्ये एक बदल

विराट कोहली हा अशा कसोटी कर्णधारांपैकी एक आहे जो आपल्या विनिंग टीम कॉम्बिनेशनमध्ये शक्यतो बदल करत नाही. त्यामुळे जोहान्सबर्ग कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रहाणे आणि पुजाराची जागा पक्की आहे. मात्र जहान्सबर्गच्या खेळपट्टीवर उमेश यादवला संधी मिळू शकते, कारण त्याच्याकडे वेग आहे. त्यामुळे त्याला संघात शार्दुल ठाकूरच्या जागी संधी मिळू शकते. वाँडरर्सच्या खेळपट्टीवरील गवत आणि वेग उमेश यादवच्या गोलंदाजीला साजेसा आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन : केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर. अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर / उमेश यादव.

इतर बातम्या

IND vs SA: अन्यथा टीम इंडियाचा घात होईल, ‘या’ विभागात कामगिरी सुधारावीच लागेल

IND vs SA ODI Team: भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने जाहीर केला संघ

IND vs SA: ‘घाबरुन जाण्याची गरज नाही’, दुसऱ्या टेस्टआधी दक्षिण आफ्रिकन कर्णधाराचं वक्तव्य

(Ind vs SA, 2nd Test, Johannesburg weather report : Rain is likely to disrupt today’s game)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.