IND vs SA | टीम इंडियाचा डाव गडगडण्याला हाच प्लेयर जबाबदार, प्रसिद्ध क्रिकेटपटूच स्पष्ट मत

IND vs SA |सध्या टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरु आहे. टीम इंडियाचा दौरा अंतिम टप्प्यात आहे. सध्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु आहे. या सीरीजमध्ये टीम इंडियाचा एक प्लेयर चांगला खेळतोय. त्याच्या प्रदर्शनात सातत्य दिसलय. पण केप टाऊन कसोटीत टीम इंडियाचा डाव गडगडला, त्याच्यासाठी त्याला जबाबदार धरण्यात येत आहे.

IND vs SA | टीम इंडियाचा डाव गडगडण्याला हाच प्लेयर जबाबदार, प्रसिद्ध क्रिकेटपटूच स्पष्ट मत
ind vs sa 2nd test Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 8:06 AM

IND vs SA Test | टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये केप टाऊन येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या कसोटी सामन्याचा निकाल आज दुसऱ्या दिवशीच लागू शकतो अशी स्थिती आहे. कारण काल पहिल्याच दिवशी 23 विकेट गेले. केट टाऊनची विकेट गोलंदाजांना अनुकूल आहे. त्यामुळे इथे गोलंदाज वर्चस्व गाजवतायत. काल टीम इंडियाने दमदार सुरुवात केली होती. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 55 धावात गुंडाळला. पहिल्या कसोटीतील पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने टीम इंडिया खेळतेय असं अनेकांना वाटलं. मोहम्मद सिराजने आपल्या वेगवान गोलंदाजीची दहशत दाखवून दिली. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याला जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमारने चांगली साथ दिली. दोघांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट काढल्या. टीम इंडियाची ही कामगिरी पाहून केप टाऊन कसोटीवर वर्चस्व गाजवणार असं दिसत होतं.

पण हा अंदाज फोल ठरला. टीम इंडियाने रबाडा-एन्गिडीच्या वेगवान गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. टीम इंडियाचा डाव 153 धावात आटोपला. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेवर फक्त 98 धावांची आघाडी मिळाली. खरतर टीम इंडियाकडे मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली. एका टप्प्यावर टीम इंडियाच्या 4 बाद 153 धावा होत्या. पण त्यानंतर शुन्यावर टीम इंडियाने 6 विकेट गमावले. परिणामी 153 धावात टीम ऑलआऊट झाली. टीम इंडियाच्या नावावर एका नकोशा रेकॉर्डची नोंद झाली.

दक्षिण आफ्रिकेला मॅचमध्ये आणण्यात त्याचही योगदान

केएल राहुल बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडला. रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि विराट कोहली हे एकामागोमाग एक तंबूत परतले. भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्यामते टीम इंडियाचा डाव गडगडण्याला केएल राहुल कारणीभूत आहे. त्यांच्यामते केएल राहुल फक्त बाद झाला नाही, तर तो खूप बचावात्मक होऊन खेळला. केएल राहुलने 33 चेंडूत 8 धावा केल्या, यात एक चौकार होता. “तुम्ही फटके मारले पाहिजेत. केएल राहुल खूपच बचावात्मक होऊन खेळत होता. तुम्ही इतके बचावात्मक झालात, तर तुम्ही खेळपट्टीवर टिकू शकत नाही. दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये परतली, त्यामध्ये केएल राहुलचही छोटस योगदान आहे” असं संजय मांजरेकर ESPNCricinfo वर म्हणाले.

किती टार्गेट असेल तर टीम इंडिया जिंकू शकते?

सध्या दक्षिण आफ्रिकेच्या 3 बाद 62 धावा झाल्या आहेत. अजून ते 36 धावांनी पिछाडीवर आहेत. 125 धावांच्या आसपास टार्गेट असेल, तर टीम इंडिया मॅच जिंकेल असं मांजरेकरांच मत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.