IND vs SA: पुण्याच्या ऋतुराजची एकदम ‘कडक’ बॅटिंग, असे मारले 5 चेंडूत 5 चौकार, पहा VIDEO
विशाखापट्टनम येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) तिसरा टी 20 सामना सुरु आहे. भारतासाठी आजचा सामना 'करो या मरो' आहे. कारण काहीही करुन भारताला आज विजय मिळवावाच लागेल.
मुंबई: विशाखापट्टनम येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) तिसरा टी 20 सामना सुरु आहे. भारतासाठी आजचा सामना ‘करो या मरो’ आहे. कारण काहीही करुन भारताला आज विजय मिळवावाच लागेल. पाच सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ 2-0 ने आघाडीवर आहे. आजचा सामना हरला, तर दक्षिण आफ्रिकेची मालिकेत विजयी आघाडी होईल. त्यामुळे भारताला आज सामना जिंकावाच लागेल. भारताचे सलामीवर ऋतुराज गायकवाड (Rututaj Gaikwad) आणि इशान किशनने (Ishan Kishan) दमदार सुरुवात करुन दिली. पहिल्या 10 षटकात भारताच्या एक बाद 97 धावा झाल्या आहेत. पावरप्लेमध्येच भारताच्या बिनबाद 57 धावा झाल्या होत्या. केएल राहुलच्या जागी संधी मिळालेल्या ऋतुराज गायकवाडने आज मिळालेल्या संधीच सोनं केलं.
ऋतुराज गायकवाडने नॉर्खियाला पाच चेंडूवर मारलेले पाच चौकार पाहण्यासाठी इथे क्लिक करा
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु धु धुतलं
त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. त्याच्या झंझावातामुळेच भारताला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण करता आला. केएल राहुल दुखापतीमुळे या मालिकेत खेळत नाहीय. त्यामुळे ऋतुराजला सलामीला येण्याची संधी मिळाली. त्याला पहिल्या दोन सामन्यात प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. पहिल्या टी 20 सामन्यात त्याने 23 धावा केल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये तो फ्लॉप ठरला होता. त्यामुळे आज तिसऱ्या सामन्यात ऋतुराजला संधी मिळणार नाही, अशी चर्चा होती. पण टीम इंडियाने तोच संघ कायम ठेवला.
5⃣7⃣ Runs 3⃣5⃣ Balls 7⃣ Fours 2⃣ Sixes@Ruutu1331 set the ball rolling for #TeamIndia & scored his first international FIFTY. ? ? #INDvSA | @Paytm
Watch his stroke-filled knock ? ?https://t.co/q3JrJAz82K
— BCCI (@BCCI) June 14, 2022
एका षटकात 20 धावा वसूल केल्या
ऋतुराजने मिळालेल्या संधीचं सोन केलं. पहिली दोन षटक सावध फलंदाजी केली. त्यानंतर तिसऱ्या षटकापासून सलामीवीरांनी आक्रमक पवित्रा घेतला. एनरिक नॉर्खिया दक्षिण आफ्रिकेचा भेदक गोलंदाज आहे. पण ऋतुराजने आज त्याचा कडक समाचार घेतला. ऋतुराजने पहिलीच ओव्हर टाकणाऱ्या नॉर्खियाला पहिल्या पाच चेंडूवर पाच चौकार लगावले. सहाव्या चेंडूवर संधी हुकली. त्याच्या एका षटकात 20 धावा वसूल केल्या. त्यानंतर ऋतुराजची वादळी खेळी कायम होती. अखेर केशव महाराजने त्याला बाद केलं. आपल्या गोलंदाजीवर डाइव्ह मारुन ऋतुराजचा झेल घेतला. ऋतुराजने 35 चेंडूत 57 धावा केल्या. यात सात चौकार आणि दोन षटकार आहेत. ऋतुराजला संपूर्ण आयपीएलच्या सीजनमध्ये लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. आज त्याने ती भरपाई केली.