IND vs SA : यशस्वी जयस्वालच्या निर्णयाने शुबमन गिलचं मोठं नुकसान, थोडी साथ दिली असती तर…
भारत दक्षिण अफ्रिका यांच्यात तिसरा टी20 सामना सुरु आहे. हा सामना काहीही करून भारताला जिंकणं गरजेचं आहे. अन्यथा मालिका हातून जाईल. त्यामुळे मोठ्या धावसंख्येसह गोलंदाजीतही चांगलं प्रदर्शन करावं लागेल. असं असताना टीम इंडियाला शुबमन आणि यशस्वीने चांगली सुरुवात करून दिली. पण एक चूक महागात पडली.
मुंबई : भारत आणि दक्षिण अफ्रिकेत तिसरा आणि निर्णायक सामना सुरु आहे. हा सामना भारतासाठी करो या मरोची लढाई आहे. कारण तीन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण अफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिला सामना वाय गेल्याने आता तिसऱ्या सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवायचा आहे. दुसऱ्या सामन्यात शून्यावर परतलेल्या यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल यांच्याकडून मोठ्या खेळाची अपेक्षा होती. दोघांनी आघाडीला येत चांगली सुरुवात केली. दोन षटकात 29 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा घेता येणार होता. पण शुबमन गिलचं नशिब फुटकं निघालं. दक्षिण अफ्रिकेसाठी तिसरं षटक टाकणाऱ्या केशव महाराजने दुसऱ्या चेंडूवर शुबमन गिलला फसवलं. स्विप शॉट मारण्याच्या नादात बॉल पॅडवर आदळला आणि जोरदार अपील करण्यात आली. पंचांनी क्षणाचाही विलंब न करता बाद दिलं. पण पंचांच्या निर्णयाचा गिलला संशय आला आणि तो नॉन स्ट्राईकला उभ्या असलेल्या यशस्वी जयस्वालकडे गेला. त्याच्याशी संवाद साधला आणि तंबूच्या दिशेने परतला.
शुबमन गिल बाद झाल्यानंतर नेहमीप्रमाणे बाद होता की याची शहनिशा झाली. तेव्हा शुबमन गिलला नशिबाची साथ मिळाली असती, पण यशस्वी जयस्वालने रिव्ह्यू घेण्यास नकार दिल्याने तंबूत परतावं लागलं. कदाचित हा रिव्ह्यू घेतला असता शुबमनला जीवदान मिळालं असतं. कारण चेंडू लेग स्टंपबाहेर जात असल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे 100 टक्के नाबाद ठरला असता असं समालोचक सांगत होते. शुबमन गिलची 12 धावांची खेळी मोठी होऊ शकली असती.
It was an unfortunate wicket for Shubman Gill, as he didn't review it in the end 👀🏏#SAvIND #ShubmanGill #Insidesport #cricket pic.twitter.com/C6Z6fUFGK3
— Hina khan💫❤️ (@DRHinaKhan0) December 14, 2023
शुबमन गिलच्या विकेटनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण त्याला नशिब साथ देत नसल्याचं म्हणत आहेत. दुसरीकडे, शुबमन गिल बाद झाल्यानंतर लगेचच तिलक वर्माही दुसऱ्या चेंडूवर बाद होत तंबूत परतला. त्यामुळे टीम इंडिया दबावात आली होती. पण सूर्यकुमार यादव तसं होऊ देईल तर नाही. त्याने यशस्वी जयस्वालसोबत मोठी खेळी केली. तसेच दोघांनी अर्धशतकी खेळी केली.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रीझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रेट्झके, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, अँडीले फेहलुकवायो, केशव महाराज, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी, नांद्रे बर्गर
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मुकेश कुमार