IND vs SA: आवेश खानने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटुची बॅट तोडली, टीम इंडियाला करावी लागली नुकसान भरपाई VIDEO
IND vs SA: भारतीय चाहत्यांना अपेक्षित असलेला निकाल लागला नाही. दक्षिण आफ्रिकेने यजमान भारताचा 7 विकेटने पराभव केला. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे विशाल लक्ष्य ठेवलं होतं.
मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) काल पहिला टी 20 सामना झाला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये ही मॅच झाली. या सामन्यात भारतीय चाहत्यांना अपेक्षित असलेला निकाल लागला नाही. दक्षिण आफ्रिकेने यजमान भारताचा 7 विकेटने पराभव केला. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे विशाल लक्ष्य ठेवलं होतं. धावसंख्येचा आकडा पाहता, भारतीय संघ हा सामना सहज जिंकेल, असं सर्वांना वाटलं होतं. पण डेविड मिलर (David Miller) आणि रासी वॅन डार डुसेने (rassie van der dussen) भारताच्या विजयाच्या इच्छेवर पाणी फिरवलं. दोघांनी मिळून भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. या सामन्यादरम्यान आवेश खानकडून अजाणतेपणी एक गोष्ट घडून गेली. त्यानंतर संपूर्ण सामन्याचा नूरच पालटला. आवेश खानच्या एका वेगवान चेंडूने दक्षिण आफ्रिकन फलंदाज रासी वॅन डार डुसेच्या बॅटचे दोन तुकडे केले. त्यानंतर संपूर्ण सामनाचा फिरला.
तिसरा यॉर्कर लेंथ चेंडू होता
भारताने 211 धावा केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे तीन विकेटही काढले होते. क्रीझवर असलेले डेविड मिलर आणि रासी वॅन डार डुसे भारतीय गोलंदाजीवर प्रहार करत होते. रासी वॅन क्रीझवर आला, त्यावेळी सुरुवातीला त्याला थोडा संघर्ष करावा लागला. आवेश खान 14 वी ओव्हर टाकत होता. पहिल्या तीन चेंडूंवर कुठलीही धाव निघाली नाही. तिसरा यॉर्कर लेंथ चेंडू होता. तो चेंडू ड्राइव्ह करण्याच्या प्रयत्नात रासीच्या बॅटला मोठा तडा गेला. बॅटचे दोन तुकडे झाले.
आवेश खानचा वेगवान चेंडू बॅटचे दोन तुकडे इथे क्लिक करुन VIDEO पहा
चौफेर फटेकबाजी केली
त्यावेळी रासी 26 चेंडूत 22 धावांवर खेळत होता. त्याने बॅट बदलली. बॅट बदलल्यानंतर रासी डुसेने खेळायचा गिअरच बदलला. रासीला त्याचा सूर सापडला. त्याने भारतीय गोलंदाजांवर प्रहार सुरु केला. चौफेर फटेकबाजी केली. या दरम्यान त्याला एक जीवदानही मिळालं. 17 व्या ओव्हरमध्ये त्याने तीन सिक्स आणि एक फोर मारला.
बॅट बदलल्यानंतर किती धावा केल्या?
बॅट बदलल्यानंतर त्याने 11 चेंडूत 30 धावा ठोकल्या व अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 46 चेंडूत नाबाद 75 धावा फटकावल्या. शेवटपर्यंत तो नाबाद राहिला. नवीन बॅटने रासीने 20 चेंडूत 53 धावा फटकावल्या. रासी आणि मिलर दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी नाबाद 131 धावांची भागीदारी केली व भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.