IND vs SA Test | पहिल्या टेस्टआधी आपल्याच 2 खेळाडूंनी रोहित शर्मा, राहुल द्रविडला दिलं टेन्शन, कोण आहेत ते?
IND vs SA Test |भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरला सेंच्युरियनमध्ये खेळला जाणार आहे. या टेस्टची तयारी जवळपास पूर्ण झालीय. कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधी टीम इंडियासमोर एक मोठा प्रश्न आहे. हा खूप कठीण प्रश्न आहे. ज्याच उत्तर कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांना शोधाव लागेल.
IND vs SA Test | भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा अंतिम टप्प्यात आहे. T20I आणि वनडे सीरीजनंतर आता टेस्ट सीरीज आहे. उद्या 26 डिसेंबरपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. सीरीजमधला पहिला सामना बॉक्सिंग डे टेस्ट आहे. सेंच्युरियनमध्ये हा कसोटी सामना खेळला जाईल. वनडे सीरीज जिंकल्यानंतर टीम इंडियाचा जोश हाय आहे. कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधी एक प्रश्न आहे. कारण कोच आणि कॅप्टनला आपल्याच टीमच्या 2 खेळाडूंनी टेन्शन दिलं आहे. टेस्टमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाच नेतृत्व करेल.
ते कुठले दोन खेळाडू आहेत? ज्यांच्यामुळे हेड कोच राहुल द्रविड आणि कॅप्टन रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टआधी टेन्शनमध्ये आले आहेत. या प्रश्नाच उत्तर टीम इंडियाचे दोन पेसर मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णाशी जोडलेलं आहे. या दोघांपैकी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण खेळणार? हा कोच आणि कॅप्टनसमोरचा मुख्य प्रश्न आहे.
दोघांपैकी कोणाला खेळवायच? हा मोठा प्रश्न
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला कसोटी सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जाणार आहे. हा पीच फास्ट आहे. इथे चेंडूला बाऊन्स आणि वेग मिळतो. क्यूरेटरने दिलेल्या माहितीनुसार, या पीचवर स्पीड आणि बाऊन्स असेल. असं असेल, तर मॅच बघायला एक वेगळी मजा येईल. कारण गोलंदाजांना सुद्धा समान संधी आहे. मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यापैकी कोणाला खेळवायच? हा टीम इंडियासमोरचा प्रश्न असेल.
लाइन लेंथ ही त्याची खासियत
सेंच्युरियनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. पृष्ठभाग हार्ड असल्यामुळे चेंडूला उसळी मिळते. दिवस मावळतीकडे सुरु झाल्यानंतर चेंडू रिव्हर्स स्विंग सुद्धा होतो. अशा स्थितीत रोहित आणि द्रविडची पहिली पसंती मुकेश कुमारला मिळू शकते. पण तो फॉर्ममध्ये आहे का? हा प्रश्न आहे. कारण वनडेमध्ये मुकेश कुमार त्याच्या बेस्ट फॉर्ममध्ये दिसला नाही.
टेस्ट क्रिकेटमध्ये मुकेशने 21 च्या सरासरीने 40 फर्स्ट क्लास सामन्यात 151 विकेट काढल्यात. मुकेशच्या क्षमतेबद्दल बोलायच झाल्यास तो लॉन्ग स्पेल टाकू शकतो. रिव्हर्स स्विंगही त्याला चांगला जमतो. त्याशिवाय लाइन लेंथ ही त्याची खासियत आहे.
तो राहुल द्रविड यांचा फेव्हरेट
भारतीय थिंक टँक प्रसिद्ध कृष्णाबद्दल काय विचार करते? त्यावर मुकेश कुमारला बॉक्सिंग डे टेस्टसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार की नाही? हे अवलंबून असेल. प्रसिद्ध द्रविडचा फेव्हरेट म्हटला जातो. 2015 मध्ये फर्स्ट क्लास डेब्यु केल्यानंतर प्रसिद्ध कृष्णा 15 मॅचही खेळलेला नाहीय. पण त्याची दक्षिण आफ्रिके अ विरुद्धची कामगिरी मुकेश कुमारपेक्षा सरस आहे. त्याने अनऑफिशिएल टेस्टमध्ये 5 विकेट काढले होते. सातत्य ही प्रसिद्धची ताकत आहे. त्यामुळे अशा स्थितीत राहुल द्रविड प्रसिद्ध कृष्णाचा विचार करु शकतात.