IND vs SA: David Miller ला धक्का, आवडत्या लिटिल ‘रॉकस्टारचं’ कॅन्सरमुळे निधन

IND vs SA: डेविड मिलरने ज्या लहान मुलीसोबत फोटो पोस्ट केलाय, कोण आहे ती?

IND vs SA: David Miller ला धक्का, आवडत्या लिटिल 'रॉकस्टारचं' कॅन्सरमुळे निधन
david miller fan Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Oct 09, 2022 | 11:15 AM

मुंबई: भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकन टीममधील काही खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केलय. यात स्फोटक फलंदाज डेविड मिलरच नाव आघाडीवर आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने टी 20 मध्ये दणदणीत शतक ठोकलच. पण लखनौमध्ये झालेल्या पहिल्या वनडे मॅचमध्येही दमदार खेळ दाखवला.

मिलरला बसला धक्का

टीमच्या विजयात त्याने महत्त्वाच योगदान दिलं. मिलरच्या बाबतीत एवढ सगळं चांगलं घडत असताना, एका बातमीमुळे त्याला धक्का बसला आहे. मिलरच्या खूप जवळ असणाऱ्या एका लिटिल रॉकस्टारने जगाचा निरोप घेतलाय.

मिलरच मन मोडलं

डेविड मिलरने शनिवारी 8 ऑक्टोबरला त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केलाय. मिलरच्या त्या पोस्टने सर्वांनाच धक्का देत भावूक बनवलं. मिलरने एका लहान मुलीसोबत आपला फोटो पोस्ट केला. कॅन्सरमुळे या मुलीच निधन झालय. ही लहान मुलगी बराच काळ कॅन्सरशी झुंज देत होती. मिलरने या पोस्टच्या माध्यमातून मुलीच्या निधनाची माहिती दिली. त्याने त्या छोट्या मुलीबद्दल वाटणारं प्रेम आणि दु:ख व्यक्त केलं.

मिलरने त्याच्या पोस्टमध्ये काय म्हटलय?

“तुझं मन खूप मोठं होतं. हे मला माहित आहे. तुझी मला भरपूर आठवण येईल. तू तुझी लढाई एका नव्या उंचीवर घेऊन गेलीस. नेहमीच तू सकारात्मक होतीस. चेहऱ्यावर तुझ्या हास्य होतं. तू तुझ्या प्रवासात प्रत्येक व्यक्ती, आव्हानांना आपलस केलस. आयुष्याच्या प्रत्येक क्षणात जगण्याचा आनंद घेतला पाहिजे, हे तू मला शिकवलस” असं डेविड मिलरने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कोण आहे ही मुलगी?

डेविड मिलरच्या या पोस्टमुळे अनेकांचा गैरसमज झाला. पण ही डेविड मिलरची मुलगी नाही. ही मुलगी डेविड मिलरची मोठी फॅन होती. अनेकदा ती दक्षिण आफ्रिकेच्या मॅच बघण्यासाठी स्टेडियममध्ये यायची. मिलरही आपल्या या छोट्या फॅनला भेटण्याची एकही संधी सोडायचा नाही. तिच्यासोबत बोलायचा, वेळ घालवायचा. या मुलीला कॅन्सरसारखा दुर्धर आजार होता. तिची या आजारासोबत लढाई सुरु होती.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.