Ind vs SA : सीरीजच्या वेळापत्रकामुळे चाहते नाराज, पाहा कधी सुरु होणार सामना
IND vs SA Series : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिका १० डिसेंबरपासून सुरु होत आहे. पण हे सामने पाहण्यासाठी चाहत्यांना आपली झोप खराब करावी लागणार आहे. पाहा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सीरीज कुठे पाहता येणार. कसं असणार संपूर्ण वेळापत्रक.
India vs South Africa : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोघांमध्ये पहिल्या सामना 10 डिसेंबर रोजी होणार आहे. टीम इंडिया विजयासाठी सज्ज झाली आहे. यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादवला पहिल्या टी-20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनसाठी अधिक संघर्ष करावा लागणार आहे. कारण अनेक मोठे खेळाडू पुनरागमन करत आहेत. पण या सीरीजच्या वेळेमुळे चाहते काहीसे नाराज झाले आहेत. कारण हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांची झोप खराब होणार आहे.
रात्री 9.30 वाजता सुरु होणार सामना
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी-20 सामना रविवारी 10 डिसेंबर रोजी डर्बन येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरू होईल. 9 वाजण्याच्या सुमारास टॉस होईल. टी-२० सामना पूर्ण होण्यासाठी साधारणपणे चार तास लागतात. त्यामुळे सामना जर 9.30 वाजता सुरू झाला तर तो 1 नंतर संपणार आहे. सामना रविवारी असल्याने दुसऱ्या दिवशी कामावर ही जावे लागणार आहे. मालिकेतील दुसरा सामना १२ तारखेला तर तिसरा सामना १४ डिसेंबरला होणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेतील शेवटचे दोन सामने संध्याकाळी 4.30 वाजता सुरू होतील. 17 डिसेंबरपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. हे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होतील, म्हणजेच दुपारी एकच्या सुमारास नाणेफेक होईल. एकदिवसीय सामने पूर्णपणे चालले तर आठ तास लागतात. म्हणजे दीड वाजता होणारा सामना साडेनऊच्या सुमारास संपेल.
ही दिलासादायक बाब असली तरी प्रत्येक सामना यावेळी सुरू होईलच असे नाही. दुसरा एकदिवसीय सामना दुपारी 4.30 पासून खेळवला जाईल. यासाठी आठ तासांची भर पडल्यास रात्री 12.30 पर्यंत सामना सुरू राहू शकतो. तिसरा सामनाही संध्याकाळी साडेचार वाजता सुरू होईल. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरपासून सुरू होईल, जो दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. हा सामना रात्री 9 ते 9.30 च्या सुमारास संपेल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 मालिका
पहिला T20I – 10 डिसेंबर 2023, किंग्समीड, डर्बन येथे रात्री 9:30 IST दुसरा T20 सामना – 12 डिसेंबर 2023, रात्री 9:30 IST, सेंट जॉर्ज पार्क, Gqebarha तिसरा T20I – 14 डिसेंबर 2023, रात्री 9:30 IST, न्यू वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका
पहिली एकदिवसीय- १७ डिसेंबर २०२३, दुपारी १:३० IST, न्यू वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग दुसरी एकदिवसीय- 19 डिसेंबर 2023, संध्याकाळी 4:30 IST, सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा तिसरी एकदिवसीय- २१ डिसेंबर २०२३, दुपारी ४:३० IST, बोलंड पार्क, पार्ल
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका
पहिली कसोटी – 26-30 डिसेंबर 2023, दुपारी 1:30 IST सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन येथे दुसरी कसोटी – 3-7 जानेवारी, 2024 दुपारी 2:00 IST न्यूलँड्स, केपटाऊन येथे
कुठे पाहता येणार सामना ?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20I, ODI आणि कसोटी मालिका स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केली जाईल आणि Disney+Hotstar वर ऑनलाइन पाहता येईल.