Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्याने दिनेश कार्तिकला स्ट्राइक का दिला नाही? त्यावर आशिष नेहरा म्हणाला…. VIDEO

पहिल्या T 20 सामन्यात भारताला अपेक्षित निकाल लागला नाही. गुरुवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा (IND vs SA) सात विकेटने पराभव केला.

IND vs SA: शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्याने दिनेश कार्तिकला स्ट्राइक का दिला नाही? त्यावर आशिष नेहरा म्हणाला.... VIDEO
Hardik pandya-Dinesh Karthik Image Credit source: hotstar
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 11:59 AM

मुंबई: पहिल्या T 20 सामन्यात भारताला अपेक्षित निकाल लागला नाही. गुरुवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा (IND vs SA) सात विकेटने पराभव केला. भारतीय संघ मायदेशात खेळतोय. त्यामुळे टीम इंडियाच पारड जड मानलं जात होतं. पण भारतीय खेळाडूंना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. या सामन्यात अनेक हैराण करणाऱ्या गोष्टी घडल्या. भारतीय गोलंदाजांनी खराब बॉलिंग केली. श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सोपा झेल सोडला. त्याशिवाय आणखी एक गोष्ट या सामन्यात घडली. ज्याने सगळयांच लक्ष वेधून घेतलं. शेवटच्या षटकात हार्दिक पंड्या (Hardik pandya) आणि दिनेश कार्तिकची जोडी मैदानावर होती. त्यावेळी हार्दिकने दिनेश कार्तिकला स्ट्राइक दिला नाही. हार्दिक पंड्याने या सामन्यात चांगली कामगिरी केली. त्याने 12 चेंडूत 31 धावा फटकावल्या. पण दिनेश कार्तिकला स्ट्राइक न देण्याच्या त्याच्या निर्णयाने सगळ्यांनाच हैराण करुन सोडलं.

दिनेश कार्तिक नॉन स्ट्राइकवर उभा होता

भारताने या सामन्यात निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 211 धावांचा डोंगर उभा केला होता. दक्षिण आफ्रिकेकडून एनरिक नॉर्खिया गोलंदाजी करत होता. नॉर्खियाने ओव्हरमधील पाचवा चेंडू पंड्याला यॉर्कर टाकला. पंड्याने मिडविकेटला फटका खेळला. या चेंडूवर सहज धावा घेता आली असती. दिनेश कार्तिक नॉन स्ट्राइकवर उभा होता. त्याने धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिक पंड्याने नकार दिला. शेवटच्या चेंडूवर हार्दिकने 2 धावा काढल्या.

आशिष नेहरांचं भाष्य

हार्दिकच्या या कृतीवर गुजरात टायटन्सचे कोच आशिष नेहरा यांनी भाष्य केलं आहे. अलीकडेच दोघांनी मिळून आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवलं होतं. क्रीकबजशी बोलताना नेहरा गमतीने म्हणाला की, “पंड्याला शेवटच्या चेंडूआधी ती धाव घ्यायला पाहिजे होती. समोरच्या एन्डवर कार्तिक होता, मी नाही”

हार्दिकच कौतुक केलं

आशिष नेहराने हार्दिक पंड्याच कौतुक केलं. तो प्रत्येक रोल निभावू शकतो, असं नेहरा म्हणाले. “पंड्या असा खेळाडू आहे, जो प्रत्येक रोल निभावू शकतो. त्याच्याकडे फलंदाजीची कला आहे. आपण त्याला टेस्ट आणि वनडे चांगला खेळ दाखवताना पाहिलं आहे. तो कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करु शकतो” असं नेहरा म्हणाला.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.