IND vs SA : क्विंटन डीकॉकचं शतक, द. आफ्रिकेचं भारतासमोर 288 धावांचं आव्हान

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) आज वनडे सीरीजमधील (one day series) शेवटचा सामना होत आहे. केपटाऊनच्या (cape town) न्यूलँडस मैदानावर हा सामना सुरु आहे.

IND vs SA : क्विंटन डीकॉकचं शतक, द. आफ्रिकेचं भारतासमोर 288 धावांचं आव्हान
Quinton de Kock - Rassie van der Dussen
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 6:36 PM

केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) आज वनडे सीरीजमधील (one day series) शेवटचा सामना होत आहे. केपटाऊनच्या (cape town) न्यूलँडस मैदानावर हा सामना सुरु आहे. भारताचा याच मैदानावर मागच्या आठवड्यात कसोटी सामन्यात पराभव झाला होता. दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप विजय मिळवण्यापासून रोखण्याचे भारतासमोर आव्हान आहे. निराशाजनक दौऱ्याचा समाधानकारक शेवट करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. वनडे सीरीजमध्ये (ODI Series) दक्षिण आफ्रिकेने आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता प्रतिष्ठा राखण्यासाठी विजय मिळवण्याचे टीम इंडिया पुढे लक्ष्य असेल.

दरम्यान, आजच्या सामन्यात कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चाहरने सार्थ ठरवला. दीपक चाहरने वैयक्तिक दुसऱ्या (डावातील तिसऱ्या) षटकात द. आफ्रिकेला पहिला धक्का दिला. जानेमन मलानला (01) त्याने यष्टीरक्षक ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. त्यापाठोपाठ 7 व्या षटकात द. आफ्रिकेला आणखी एक धक्का बसला. के. एल राहुलने टेम्बा बवुमा 8 धावांवर असताना त्याला धावबाद केलं. त्यानंतर दीपक चाहरने वैयक्तिक सातव्या (डावातील 13 व्या) षटकात द. आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. एडन मार्क्रमला त्याने 15 धावांवर असताना ऋतुराज गायकवाडकरवी (सब्स्टिट्यूट फिल्डर) झेलबाद केलं. द. आफ्रिकेची 3 गडी बाद 70 धावा अशी स्थिती असताना सलामीवीर क्विंटन डीकॉकने एक बाजू लावून धरली होती. डीकॉकने रॅस्सी वॅन डेर डुसें याच्यासोबत 144 धावांची भागीदारी करत द. आफ्रिकेच्या डावाला आकार दिला.

क्विंटन डीकॉकचं शतक

सुरुवातीचे तीन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतरही द. आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डीकॉकने एक बाजू लावून धरली आहे. त्याने शतकी खेळीसह द. आफ्रिकेला या सामन्यात मजबूत स्थितीन नेऊन ठेवलं. डीकॉकने 108 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं. शतकानंतरही डीकॉकने हल्लाबोल चालूच ठेवला. दरम्यान, रॅस्सी वॅन डेर डुसें याने 53 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं.

जसप्रीत बुमराहमुळे भारताचं पुनरागमन

जसप्रीत बुमराहने डीकॉक आणि दुसें यांची भागीदारी मोडली. त्याने शतकवीर क्विंटन डीकॉकला 124 धावांवर असताना शिखर धवनकरवी झेलबाद केलं. तर 37 व्या षटकात युजवेंद्र चहलने रॅस्सी वॅन डेर डुसें (52) याला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद करत द. आफ्रिकेचा पाचवा गडी माघारी धाडला. ही जोडी माघारी परतल्यावर पुढे एकट्या डेव्हिड मिलरने काही वेळ प्रतिकार केला. मात्र भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या षटकात चांगलंच पुनरागमन केलं. अखेर भारताने द. आफ्रिकेचा डाव 287 धावांवर रोखला. सुरुवात चांगली होऊनही त्यांना 300 धावांचा टप्पा पार करता आला नाही.

भारताकडून या डावात प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर जसप्रीत बुमराह आणि दीपक चाहरने प्रत्येकी दोन बळी घेतले. युजवेंद्र चहलला एक विकेट मिळाली. द. आफ्रिकेचे दोन फलंदाज भारतीय क्षेत्ररक्षकांनी धावबाद केले.

इतर बातम्या

वनडे मध्ये भारतापेक्षा झिम्बाब्वे आणि स्कॉटलंडची चांगली गोलंदाजी, विश्वास नसेल तर हे आकडे पाहा

ICC U19 World Cup: युगांडावरील मोठ्या विजयानंतर क्वार्टर फायनलमध्ये भारत बांगलादेशसोबत भिडणार

hoaib Akhtar: ‘विराट कोहलीला कॅप्टनशिप सोडायला भाग पाडलं’, शोएब अख्तरचा खळबळजनक दावा

(Ind Vs Sa : Quinton de Kock century helped South Africa score 287 runs against India)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.