IND vs SA: VVS Laxman ही बनणार टीम इंडियाचे कोच, BCCI चा नवा प्लान

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात येईल. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती तरुण खेळाडूंना या मालिकेसाठी संधी देईल.

IND vs SA: VVS Laxman ही बनणार टीम इंडियाचे कोच, BCCI चा नवा प्लान
Rahul Dravid-vvs Laxman Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 11:47 AM

मुंबई: भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची T-20 मालिका (IND vs SA) आणि त्यानंतर होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी BCCI ची निवड समिती दोन वेगवेगळे संघ निवडणार आहे. फक्त दोन वेगवेगळे संघच नव्हे, तर दोन्ही टीम्ससाठी स्वतंत्र कोचिंग स्टाफ असणार आहे. इनसाइडस्पोर्टने हे वृत्त दिलं आहे. राहुल द्रविड हे सध्या भारताचे हेड कोच आहेत. ते कसोटी संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जातील, तर व्हीव्हीएस लक्ष्मण (vvs Laxman) दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड दौऱ्याच्यावेळी संघासोबत असतील. भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे, तर आर्यलंड विरुद्ध दोन टी 20 सामने होणार आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मण दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड दौऱ्यात संघासोबत असतील. मार्गदर्शक म्हणजे कोच म्हणून त्यांच हे पदार्पण असेल. बर्मिंगहॅम कसोटीपूर्वी भारतीय संघ लीसेस्टरशायर विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. राहुल द्रविड आणि भारतीय संघ 15 किंवा 16 जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होतील. “दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी आम्ही व्हीव्हीएस लक्ष्मण यांना भारतीय संघाला मार्गदर्शन करण्यासाठी सांगू” असं, बीसीसआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

दक्षिण आफ्रिका सीरीजसाठी युवा खेळाडूंना संधी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात येईल. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती तरुण खेळाडूंना या मालिकेसाठी संधी देईल. दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या या मालिकेद्वारे भारतीय संघात पुनरागमन करु शकतात. दुसरा स्क्वाड हा इंग्लंड दौऱ्यासाठी असेल.

चेतेश्वर पुजाराचं कमबॅक

चेतेश्वर पुजारा कमबॅक करु शकतो. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पुजारा दमदार कामगिरी करतोय. त्याने तिथे द्विशतक झळकावली आहेत. इंग्लिश वातावरणात खेळण्याचा त्याने चांगला सराव केलाय. त्यामुळे भारतीय संघात तो कमबॅक करु शकतो.

हे सुद्धा वाचा

सीम गोलंदाजांचा सामना करणं, सोप नाहीय

“आमच्या योजनेतून पुजारा कधीच बाहेर नव्हता. त्याने त्याचा फॉर्म परत मिळवणं आवश्यक होतं. माझ्या मते त्याने तो फॉर्म परत मिळवलाही आहे. सेकंड डिव्हिजनच्या काउंटीमध्ये त्याने शतक झळकावली असतील, पण इंग्लिश वातावरणात सीम गोलंदाजांचा सामना करणं, सोप नाहीय. पण त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी द्यायची की, नाही ते संघ व्यवस्थापनावर अवलंबून असेल” असं निवड समितीच्या एका सदस्याने इनसाइड स्पोर्ट्सला सांगितलं.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.